सलाम तुमच्या कार्याला! बालवि’वाह रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे ऑ’परेशन ‘परिवर्तन’
जरी आपल्या मनात पोलिसांबाबत संमिश्र प्रतिक्रिया असली तरी, काही पोलीस अधिकारी असे असतात जे आपल्या कामाने लोकांची मने जिंकून घेतात आणि तरुण पिढीसमोर नवा आदर्श निर्माण करतात. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील असाच एक नवीन आदर्श आपल्या समोर मांडला आहे.
जरी आपल्याकडे बा’ल’वि’वाहला बंदी असली तरी अनेक ठिकाणी या घटना चालू असतात. यामुळे त्या मुलीचे संपुर्ण आयुष्य पणाला लागते आणि हीच प्रथा मुळापासून काढून टाकण्याचे काम सोलापुराच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या करत आहेत. यासाठी त्यांनी ऑ’परेशन ‘परिवर्तन’ हाती घेतले आहे.
त्यांच्या या ऑ’परेशन मध्ये ज्या गावांमध्ये ही प्रथा चालू आहे अशा 78 गावांची निवड करून ती गावे प्रत्येक एका पोलीस अधिकाऱ्याला दत्तक देण्यात येणार आहे. यामुळे आठ दिवसांतुन एकदा त्या गावाला भेट देणे हे पोलीस अधिकाऱ्याला बंधनकारक राहील.
अनेक ठिकाणी कोणालाही न कळवता आणि छुप्या पद्धतीने बा’ल’वि’वाह होत असतात. त्यामुळे या प्रथेला मुळापासून दूर फेकण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हे ऑ’परेशन हाती घेतले आहे. ज्या प्रमाणे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यानां गाव दत्तक घेण्यास सांगितले आहे, त्याचप्रमाणे त्यांनी देखील स्वतः नरखेड गाव दत्तक घेतले आहे.
या ऑ’परेशनच्या पहिल्या टप्प्यात जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. बा’ल’वि’वाह ही अशी प्रथा आहे ज्यानंतर सर्वाधिक त्रास हा मुलीला सहन करावा लागतो आणि अशी कु’प्रथा बंद करण्यासाठी लोकांचा सहभाग असणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी लोकचळवळ उभारायला हवी, असे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे म्हणणे आहे.