वीर सुपुत्र प्रथमेश पवार यांना वयाच्या अवघ्या 22 वर्षी जम्मूत आले वी’रमरण, 3 महिन्यांपूर्वी झाले होते भरती..

आर्मीत जाऊन देशसेवा करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यात सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्यातून अनेक तरुण मुले वर्षाला आर्मीत भरती होत असतात. परंतु सातारा जिल्ह्यातील बामणोली येथील नुकतेच भरती झालेली जवान प्रथमेश संजय पवार (22) यांना वी’र’म’र’ण आले आहे.

रात्री साडे दहाच्या सुमारास जम्मू काश्मीरयेथील झालेल्या एका च’क’म’कीत जवानाला वी’र’म’र’ण आले आहे. श’हि’द जवान यांच्यावर त्यांच्या गावी अं’ति’म सं’स्कार करण्यात येणार आहेत. फक्त 3 महिन्यांपूर्वी प्रथमेश हे भारतीय सैन्यात भरती झाले होते.

जसे इतर तरुणांचे स्वप्न असते तसेच आपण देखील भारतीय सुरक्षा दलात सामील व्हावं आणि देशसेवा करावी असे प्रथमेश यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी त्यांचे स्वप्न देखील पूर्ण केले. परंतु देशसेवा करत असताना ते श’ही’द झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हे 19 मे रोजी जम्मू येथील सांबा ब्लॉक या ठिकाणी आपली ड्युटी करत होते. परंतु अचानक च’क’म’क सुरू झाली. अशावेळी द’ह’श’त’वा’द्यांना प्रत्युत्तर देत असताना त्यांच्या पायाला गो’ळी लागली.

त्यांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृ’त्यू झाला. ही बातमी कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शो’क’क’ळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page