होऊ दे खर्च! इस्लामपूर येथील विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेवर चक्क 350 हुन जास्त निमंत्रकांची नावे

सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन चालू आहे. अनके ठिकाणी विविध लग्न सोहळे पाहायला मिळत आहेत. अशावेळी अनेक बातम्या आपल्या कानावर येत आहेत. अशातच एक हटके गोष्ट एका लग्नातून समोर आली आहे.

मागील दोन वर्षांच्या काळात लग्न समारंभात फक्त 50 लोकांची उपस्थिती ही अनिर्वाय होती. मात्र सगळीकडे आता निर्बंध हटवले असून मोठ्या थाटामाटात लग्न सोहळे पार पडत आहेत. यामुळे इस्लामपूर येथील एका लग्नात एका कुटूंबाने चक्क 350 च्या वर लोकांची नावे लग्नपत्रिका मध्ये छापली आहेत.

ही पत्रिका आता शहरात सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. येथे एका पुण्यातील तरुणीचा विवाह इस्लामपूर येथे राहणाऱ्या तरुणाशी 22 मे रोजी होणार होता. त्यामुळे त्यांनी लग्नपत्रिकेत पै- पाहुण्यांची आणि निमंत्रकाची मिळून अशी 350 च्या वर नावे टाकली आहेत.

आताचा काळ या डिजिटल काळ आहे. अनेक लोक लग्नपत्रिका छापण्याऐवजी व्हाट्सएपवर लोकांना पाठवतात. परंतु या वराच्या वडिलांनी एका हटके पद्धतीने लग्न पत्रिका बनवली आहे, ज्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page