“तुझ्यासारखी पत्नी मिळाली हे माझे भाग्य आहे”, पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्नीसाठी खास ट्विट

महाराष्ट्र राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकतेच नवीन सरकार राज्यात स्थापन झाले असून माननीय एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून तर माननीय देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.

आषाढी एकदिवशीच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. 11 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. यावेळी आपल्या पत्नीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो शेअर करत खास ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुझ्यासारखी पत्नी मिळणे हे माझं भाग्य आहे’, अशा शब्दात त्यांनी लता एकनाथ शिंदे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “जीवनातील वाईट परिस्थितीत तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, मी कामात व्यस्त असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीचं कौतुक केले आणि वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघर्षमय प्रवासात त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी नेहेमीच मोलाची साथ आणि पाठिंबा दिला आहे. खासगी आयुष्यात अनेक संकटे येउन देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेहमीच साथ दिली आणि त्यांचा मुख्य आधार बनल्या.

सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांनी त्यांची 2 मुले ग’मा’व’ली, तरी देखील त्या खचल्या नाहीत आणि हार मानली नाही. त्यांनी स्वतः कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आपला संसार सांभाळला. आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयात आणि वळणावर त्यांनी पती एकनाथ शिंदे यांना नेहमीच साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page