कॉन्स्टेबल ते DSP! एकीकडे नोकरी तर दुसरीकडे लहान मुलीचा सांभाळ करत परीक्षा केली उत्तीर्ण..
ध्येय साध्य करण्यासाठी कठोर संघर्ष करावे लागतात. प्रतिभा कधीच लपत नाही असे म्हणतात. मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर इच्छित स्थळी पोहोचण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही. माणसाने एखादी गोष्ट साध्य करण्याचा निश्चय केला तर तो ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि परिणामी यश मिळतेच.
आज आपण अशाच एका धाडसी महिले विषयी जाणून घेणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत लेडी कॉन्स्टेबल बबली यांच्याबद्दल. त्या बिहार मधील बेगुसराय जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.
पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2015 मध्ये बिहार पोलिसात महिला हवालदार म्हणून तैनात झाल्या. परंतु त्यांनी त्यांचा प्रवास इथेच थांबवला नाही. त्यांना डीएसपी व्ह्याचे होते त्यासाठी त्यांनी अभ्यास चालूच ठेवला.
बीपीएससी मुख्य परीक्षेत त्यांना वारंवार अपयश येत होते. त्या निराश झाल्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. आपण अजून चांगली तयारी करू असे त्यांनी मनाशी पक्के केले. त्यामुळे बबली यांनी ठरवले की आता चांगल्या तयारीसाठी अभ्यासाला अधिक वेळ देवू आणि कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू. त्यांच्या या निर्णयात त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना चांगली साथ दिली.
त्या मेन्स पात्र होण्यासाठी पाटण्याला गेल्या आणि तिथून तयारी करायला सुरुवात केली. असे म्हणतात की, मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. तसेच बबली यांचीही मेहनत वाया गेली नाही आणि यावेळी अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. अखेर पोलीस लेडी कॉन्स्टेबल बबली बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून डीएसपी झाल्या.
बबली यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते. डॉक्टर ग’रो’द’र महिलांना विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बबली यांनी ग’रो’द’र असतानाच परीक्षेची तयारी केली आणि यश प्राप्त केले.
सध्या बबली यांना 7 महिन्यांची मुलगी आहे. तिचा सांभाळ करण्याबरोबर त्यांनी नोकरी आणि शिक्षण देखील चालू ठेवले. या यशाबद्दल बेगुसरायचे एसपी योगेंद्र कुमार यांनी बबली यांचा सत्कार केला.
बबली यांच्यासाठी हे यश मिळवणे खूप मोठी गोष्ट आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून परीक्षेची तयारी केली. अपयश आले तरी त्या खचल्या नाहीत त्यांनी त्यांचे स्वप्न साकार करून दाखवले.
आपली ड्युटी आणि आईचे कर्तव्य या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळत कॉन्स्टेबल बबली यांनी ज्या प्रकारे मेहनत घेऊन बीपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली त्यामुळे सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र बबली या जास्त चर्चेत आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्रत्येकासाठी त्या प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या आहेत.