बँकेच्या एका चुकीमुळे मुलगी झाली रातोरात श्रीमंत, अकाउंटवर जमा झाले तब्बल 24 कोटींपेक्षाही जास्त रक्कम, पण तिने असे काही केले की..

आजकाल सो’श’ल मी’डि’या’चा वापर सर्रास केला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सो’श’ल मी’डि’या’वर ॲक्टिव असतात. त्यामुळे जगभरातील गोष्टी आपल्याला समजतात. अनेक मनोरंनाच्या गोष्टीही पाहायला मिळतात. या माध्यमाद्वारे अनेकांचे आयुष्य उजळते तर काहींच्या आयष्याची वाट ही लागते.

आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट जाणून घेणार आहोत, जी सो’श’ल मी’डि’या’वर सध्या तुफान व्हायरल होत आहे. क्रिस्टीन जियस्किन ही विद्यार्थिनी सिडनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण घेत आहे. ती सध्या 21 वर्षांची आहे. 2 वर्षांपूर्वी ‘वेस्टपॅक बँकेकडून’ झालेल्या एका चुकीमुळे क्रिस्टीन या विद्यार्थिनीच्या अकाउंट मध्ये तब्बल 24 कोटींपेक्षा ही जास्त रक्कम जमा झाली.

क्रिस्टीनाने जेव्हा ही रक्कम पाहिली तेव्हा तिला आभाळ ठेंगणे झाले होते. त्यांनतर तिचे आयुष्यच बदलून गेले. तिने तिच्या राहणीमानातही बदल केला. या मुलीने दागिने घेतले, महागडे कपडे घेतले तसेच सिडनी मधील महागड्या पेंटहाऊस मध्ये घर देखील बांधले.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिने ह्या सर्व गोष्टींसाठी 11 महिन्यात अकाउंट मध्ये असलेल्या करोडोंची रक्कम उडवली. 2.5 लाखांच्या सुमारास रक्कम तिने तिच्या पर्सनल अकाउंट वरही ट्रान्सफर करून ठेवली होती. कोट्याधीश झालेल्या या मुलीचा तोरा काही औरच होता. ती राजेशाही थाटात आयुष्य जगत होती.

ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तपास करायला सुरूवात केली तेव्हा क्रिस्टीना फ’रा’र झाली. मलेशिया मध्ये राहत असलेल्या तिच्या प्रियकराला तिच्याबद्दल विचारले असता त्याने ही या सर्व प्रकाराबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास करून 10 कोटी रुपयांची रक्कम परत जमा करण्यात यश आले आहे. परंतु राहिलेली रक्कम अजूनही मिळालेली नाही.

या सर्व प्रकाराबाबत क्रिस्टीनाची चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या पालकांनी तिच्यासाठी हे पैसे तिच्या अकाउंट वर दिले असतील असे तिला वाटले. बँकेच्या एका चुकीमुळे ही मुलगी रातोरात श्रीमंत झाली आणि मिळालेल्या रक्कमेची चौकशी ही न करता ती रक्कम आपल्या चैनीसाठी तिने उडवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page