ही आजी केवळ 1 रुपयात विकते इडली, आजीबाईंच्या या कार्याचे मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक..
इडली म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला आपसूकच पाणी सुटते. इडली खाल्ल्यामुळे पोट ही भरते आणि काम करण्याची ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे कित्येक लोकांचा रोजचा दिवस इडली खावूनच सुरू होत असतो. आज आपण अशाच एका इडली विकणाऱ्या आजींविषयी जाणून घेणार आहोत.
तामिनाडूमधील कोईम्बतूर येथे राहणाऱ्या एम कमलथल नावाच्या 87 वर्षीय आजी मागील 30 वर्षांपासून इडली विकतात आणि विशेष म्हणजे या आजी केवळ 1 रुपयात इडली विक्री करतात. या आजी कोईम्बतूर इथे असलेल्या त्यांच्या राहत्या घराच्या आवारात दुकान टाकून इडली विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
जे लोक बाहेरगावावरून येतात आणि ज्यांना घरी जाण्यासाठी दुसरा पर्याय उलब्ध नसतो त्यामुळे त्या लोकांना स्वतःसाठी काही जेवण बनवणे शक्य नसते अशा लोकांसाठी या आजी केवळ 1 रुपयात इडली विकतात.
गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत महागाईमध्ये एवढी प्रचंड वाढ झालेली असूनही त्यांनी मात्र आपल्या इडलीच्या किंमतीत थोडाही बदल केलेला नाही. इडलीसाठी लागणाऱ्या सामग्रीमध्ये असणाऱ्या डाळी तसेच इतर जिन्नस या साऱ्या सामग्रींच्या किंमतीमध्ये वाढ झालेली असली तरीही आजीबाईंनी त्यांच्या 1 रुपय इडलीच्या किंमती मध्ये वाढ केलेली नाही.
त्या दररोज जवळपास 300 लोकांना 1 रुपयात इडली विकतात आणि त्यांना संतुष्ट करतात. सगळ्या गोष्टी महागल्या असूनही त्यांनी आपला भाव वाढवला नाही. उलट त्यांच्या दुकानात इडलीसाठी रांगा लागलेल्या असायच्या.
तेव्हा देखील आजीबाईंनी सगळ्यांना नियमांचे नीट पालन केले आणि इडली विक्री केली. त्या काळात अनेकांचे काम गेले होते. सगळे घरात बसून होते. मात्र, तेव्हा या आजींचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू होता.
आजींना इडली बनवण्यासाठी लागलणारे जे साहित्य आहे ते त्यांचे हितचिंतक त्यांना पुरवत असतात. आजींच्या या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या गौरव केला आहे.
आजीबाईंच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. या वयातही त्या एवढे चांगले कार्य करत आहेत हे बघून प्रत्येकाला काम करण्याची नवीन ऊर्जा मिळेल. आज त्या अनेजणांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.