भट्टीत काम करणाऱ्या बापाची तिन्ही मुले आहेत आता उच्च पदावर, वडील मुलांसाठी दिवसरात्र मेहनत करायचे..

आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपले वडील नेहमीच कष्ट करत असतात. स्वतःचा विचार न करता आधी आपल्या मुलांच्या कल्याणाचा विचार करतात. मुलांना चांगले आयुष्य जगता यावे म्हणून वडील आयुष्यभर खस्ता खातात. आज आपण अशाच एका मेहनती वडिलांबद्दल जाणून घेणार आहोत.

राजकोट मधील रफळ येथे राहणारे हंसराजभाई सोजित्रा हे एका भट्टीत काम करत होते. हंसराजभाई यांची पत्नी नंदूबेन यांना 3 अपत्य आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. हंसराजभाई हे आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी दिवसरात्र मेहनत करायचे. हंसराजभाई हे स्वत: अशिक्षित होते, परंतु त्यांनी आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी कोणतीच कमतरता भासू दिली नाही.

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमी पैशांची बचत करायचे. एकदा त्यांनी आपली सायकल विकली आणि आलेल्या पैशांचा वापर मुलांच्या अभ्यासासाठी केला. त्यांनी आपल्या तीनही मुलांना करियर निवडी बाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.

हंसराजभाईं यांची मोठी मुलगी निराले हिने सरकारी आयुर्वेद महाविद्यालयामधून एम.डी. शिक्षण घेतले आणि नंतर पीएचडीची पदवी देखील प्राप्त केली. सध्या त्या त्रिपुरा येथे सरकारी भारतीय अधिकारी म्हणून आपले कार्य बजावत आहेत.

हंसराजभाईं यांच्या छोट्या मुलीने ही सरकारी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आणि पुढे बेंगळूर येथील कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. दोन्ही मुलीनंतरचा सगळ्यात लहान मुलगा केऊर हा देखील उच्चशिक्षित आहे. त्याने व्यवस्थापन या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले आणि तो सध्या नामांकित कंपनीत नोकरी करत आहे.

हंसराजभाई यांनी नेहमी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी स्वतःला आयुष्याभर कामात पूर्णपणे झोकून दिले होते. यामुळेच त्यांच्या मुलांचे भविष्य उजळले. मात्र, काही काळापूर्वी दु’र्दै’वा’ने आजारी असल्यामुळे हंसराजभाईंनी आपल्यातून निरोप घेतला.

“आमच्या वडीलांनी केलेल्या कष्टांमुळेच आज आम्ही आमचे जीवन आनंदात व्यतीत करत आहोत. त्यांनी आयुष्यभर आमच्या चांगल्या भविष्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. मात्र आम्हाला कोणतीच कमतरता भासू दिली नाही,” असे त्यांची मुले सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page