सण साजरा करण्यासाठी मुलाला घरी घेऊन जाताना झाला भी’षण अपघा’त, मुलासह आई-वडील गं’भीर ज’खमी
अनेकदा सूचना देऊन देखील लोक गाडी चालवताना नियम पाळत नाहीत आणि त्यामुळेच अ’प’घा’तां’च्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्ही देखील हादरून जाल. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मधील नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असणारा विद्यार्थी हर्षल नायकर याला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी त्याचे आई-वडील रागिनी नायकर आणि शिवकुमार नायकर हे शाळेत आले होते.
तिघेजण जीप मधून घरी जात होते. तेव्हा अचानक काळाने त्यांचावर घा’ला घातला. निंबोणी गावानजीक यांची जीप आणि समोरून आलेल्या डंपर ची जोरदार ध’ड’क झाली. हा अ’प’घा’त एवढा भी’ष’ण होता की यात जीपची एक साईड पूर्णपणे चूरडली गेली आहे.
या अ’प’घा’ता’त हर्षल आणि त्याचे आईवडील दोघे ही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.