20 वर्षीय विद्यार्थीनी चक्क 52 वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली, प्रेमाची कबुली दिली आणि..
सो’श’ल मी’डि’या’व’र नेहमीच काही ना काही आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. अशीच एक जोडप्याची आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. 20 वर्षीय जोया नुर ही बी.ए चे शिक्षण घेत होती. ती ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होती त्या महाविद्यालयामध्ये 52 वर्षीय साजिद अली हे शिक्षक होते.
जोयाला साजिद यांचा लूक आणि व्यक्तिमत्व नेहमीच भुरळ घालत असे आणि पुढे हळुहळू जोया साजिद यांच्या प्रेमात पडली. परंतु, सुरुवातीला साजिद जोयाकडे खूप दुर्लक्ष करत असत. तिने बराच वेळ वाट पाहिली, असे जोया सांगते. यानंतर तिने आपले प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी तिने साजिद यांच्याकडे जाऊन तिचे प्रेम व्यक्त केले.
‘माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.’ अशा प्रेमळ शब्दात तिने आपले प्रेम व्यक्त केले. जोयाने विचारल्यावर साजिद यांनी त्यांच्या दोघांच्या वयातील असलेल्या फरकावर विचार करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला. यादरम्यान साजिदही जोयाच्या प्रेमात पडू लागले आणि त्यांनी ही आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचे ठरवले.
दोघांच्याही वयात तब्बल 32 वर्षांचा फरक आहे. एवढा मोठा फरक असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनीही या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण तरीही ते दोघे त्यांच्या मतावर ठाम होते. अखेर या दोघांनीही लग्न केले आहे.
अशा प्रकारे 52 वर्षीय शिक्षकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीसोबत प्रेमविवाह केला आहे. यामुळे सध्या त्यांच्या या अनोख्या प्रेमाची गोष्ट सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र त्यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत.