UPSC साठी 55 लाखांचे पॅकेज नाकारले, 2 वर्षे एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले, AIR 29 आणून स्वतःचे भविष्य घडवले
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे, जी उत्तीर्ण होण्याचे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. काहींनी हि परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्लिअर होते तर काहींना 4-5 प्रयत्नांनंतर. पण एक वेळच्या मेहनतीने संपूर्ण भविष्य चांगले होते. असाच एक मजेशीर किस्सा आहे अजमेर येथील रहिवासी भविष्य देसाईचा. ज्याने 2 वर्ष घराबाहेर न पडता घरातील एका खोलीत कै’द राहून अभ्यास केला.
भविष्य देसाई यांनी शाळेत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. नागरी सेवेचे स्वप्न अबाधित ठेवत भविष्या यांनी दोन वर्षे स्वत:ला एका खोलीत बंद केले. ते त्यांच्या खोलीत अभ्यास करायचे आणि तिथेच खाऊन पिऊन राहायचे.
त्यांनी मोबाईलला हातही लावला नाही. विशेष म्हणजे त्यांच्या मेहनतीला पहिल्याच प्रयत्नात फळ मिळाले आणि ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. आता त्याला भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू व्हायचे आहे.
भविष्य यांनी सांगितले की त्यांनी जुलै 2020 मध्ये गुडगावमधील स्टॉ’क मा’र्के’टिं’ग कंपनीमध्ये इंटर्नशिप देखील केली होती. त्यानंतर त्यांना कंपनीने 55 लाखांचे पॅकेज दिले. परंतु त्यांनी हे पॅकेज नाकारले आणि नागरी सेवांमध्ये जाणे चांगले मानले. या क्षेत्रात जायचे आहे त्यांनी आधीच ठरवले होते. 100 च्या आत रँक मिळवण्यावर त्यांचे लक्ष होते आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC मध्ये 29 रँक मिळवून स्वतःला सिद्ध केले.