नोकरी सोडून मुलाने आपल्या आईसह तब्बल 564 दिवस 18 राज्यांमधून 56000 किलोमीटर प्रवास चक्क स्कुटरवरून केला..
आपण अनेकदा आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील. लहानपणी पालक आपल्या मुलांना नेहमी श्रावण बाळाचे उदाहरण देत असतात. ज्याने एका पालखीमधून आपल्या अं’ध पालकांना उत्तम प्रवास घडविला होता तसेच त्यांची चांगली सेवा देखील केली. अशीच इच्छा सर्व पालकांची देखील असते. म्हणून ते मुलांना अशा प्रेरणादायी कथा ऐकवून त्यांच्यावर संस्कार करत असतात.
मात्र, आताच्या या क’लि’यु’गात श्रावण बाळासारखा मुलगा भेटणे म्हणजे समुद्रातुन सुई शोधण्यासारखे कठीण आहे. परंतु, या काळात देखील एक श्रावणबाळ आहे ज्याने आपल्या आईसोबत तब्बल 56000 किमीचा प्रवास चक्क स्कूटरवरून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकामधील म्हैसूर मधील रहिवासी असलेले 43 वर्षीय कृष्णा कुमार यांनी आपले संपुर्ण आयुष्य आपल्या आईसाठी समर्पित केले आहे. कृष्णा हे बेंगळूरू येथे एका खासगी कंपनीत काम करत होते.
मात्र, आईला तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी कृष्णा कुमार यांनी आपली नोकरी सोडली आणि आपल्या 70 वर्षांच्या आईला सोबत घेऊन त्यांनी देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. या माय-लेकाने 16 जानेवारी 2018 रोजी हा प्रवास सुरू केला होता.
कृष्णा कुमार यांनी याचे नाव “मातृ सेवा संकल्प यात्रा” असे ठेवले होते. या प्रवासासाठी त्यांना जवळपास तीन वर्ष लागले. कृष्णा कुमार यांनी एकूण 2 वर्ष 9 महिन्यांत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यादरम्यान त्यांनी 564 दिवस 18 राज्यांमधून तब्बल 56000 किलोमीटर प्रवास केला आहे.
कृष्णा कुमार सांगतात, “ही स्कूटर माझ्या वडिलांची आहे. 2001 मध्ये त्यांनी मला ही स्कूटर भेट म्हणून दिली होती. त्यांनतर 2015 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. माझे वडील आमच्याबरोबर नाहीत, म्हणूनच मी माझ्या आईला स्कूटरवरून तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या प्रवासात माझे वडिल देखील आमच्यासोबत असतील. अशा प्रकारे आम्ही तिघांनी म्हणजेच माझी आई, माझ्या वडिलांचा आ’त्मा आणि मी असा आम्ही एकत्रितपणे हा प्रवास पूर्ण केला आहे.”
पुढे कृष्णा कुमार यांची आई म्हणतात, “आमचा हा प्रवास उत्तमरीत्या पार पडला. माझा या प्रवासाचा अनुभव कसा होता हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. या प्रवासादरम्यान मला कोणतीही आरोग्य समस्या आली नाही कारण माझ्या मुलाने माझी चांगली काळजी घेतली. या प्रवासात आम्ही कूठेही हॉटेलमध्ये थांबलो नाही. आम्ही नेहमीच एखाद्या मंदिर, मठ आणि आश्रम मध्ये निवारा घेतला.”
कृष्णा कुमार हे आता धर्मकर्माच्या मार्गावर चालणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. कारण ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी खूप प्रेरित झाले आहेत. त्यांनी लग्न न करता आपल्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आताच्या काळात कृष्णा कुमार यांचे आपल्या आईवरचे प्रेम पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सो’श’ल मी’डि’या’व’र देखील ते चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.