अधिकारी दाम्पत्याने श’ही’द जवानाच्या मुलीला घेतले दत्तक, म्हणाले तिला देखील IAS-IPS अधिकारी बनवणार
सामान्य लोकांच्या मनात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविषयी अनेक संमिश्र भावना असतात. अधिकारी म्हटले की, आपल्या खुर्चीचा दुरुपयोग करणारे, समाजात योग्य ते बदल न घडवणारे तसेच त्यांना समाजातील लोकांच्या भावनांचा आदर नसतो ते केवळ पैशांसाठी काम करत असतात, असे वाटत असते. परंतु, आज आपण एका अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी असे मत असणाऱ्या लोकांच्या मनातील नकारात्मक प्रतिमा बदलून अभिमानास्पद काम केले आहे.
आयएएस युनुस आणि त्यांची पत्नी आयपीएस अंजुम हे दोघेही अधिकारी आहेत. अंजुम सोलन या एसपी आहेत आणि त्यांचे पती युनुस कुल्लू हे जिल्हाधिकारी आहेत. या दाम्पत्याने सामान्य लोकांच्या मनात अधिकाऱ्यांविषयी असलेली नकारात्मकता दूर करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.
या दाम्पत्याने काम बजावत त्याचबरोरीने सामाजिक बांधिलकी जपत एका श’ही’द जवान परमजीत यांच्या 12 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे. एवढेच नव्हे तर ते आपल्या मुलीला देखील त्यांच्यासारखे अधिकारी बनवणार आहेत.
देशसेवेत कार्यरत असलेले पंजाबचे शूर पुत्र परमजीत एका च’क’म’की’त श’ही’द झाले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. श’ही’द जवान परमजीत यांची मुलगी तेव्हा 12 वर्षांची होती. परमजीत यांच्यावर त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीने अं’ति’म सं’स्का’र केले.
ही मुलगी आपल्या श’ही’द पित्याला पाहून आक्रोश करत मोठ्याने ओरडत होती. या चिमुकलीच्या हस्ते वडिलांचे अं’ति’म सं’स्का’र होत असताना उपस्थित सगळ्याच लोकांना अश्रू अनावर झाले होते. हे हृदयद्रावक दृश्य पाहून आयएएस युनुस आणि पत्नी आयपीएस अंजुम यांना देखील खूप वाईट वाटले. या मुलीची बातमी पाहताच या जोडप्याने त्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
दाम्पत्याला ही गोष्ट कोणालाही सांगायची नव्हती. मात्र, तरीही ही बाब लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांनी त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे आणि आता त्यांना अजून एक मुलगी ही आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या मुलीच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी परमजीत यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद देखील साधला आहे.
मुलीला आमच्यासोबत राहायचे आहे की तिच्या आईसोबत हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे त्याबाबत आम्ही तिच्यावर कोणताही निर्णय लादणार नाही असे अधिकारी जोडप्याने सांगितले आहे. तिचा निर्णय काहीही असेल तरी आम्ही तिचा निर्णय स्विकारू. मात्र, आम्ही तिच्या संपुर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
अधिकारी दाम्पत्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे लोकांच्या मनात अधिकाऱ्यांविषयी असलेली कटुता नाहीशी होऊन त्यांना खात्री पटेल की प्रत्येक अधिकारी हे असंवेदनशील नसतात. या दाम्पत्याने समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. आज अनेकजण त्यांच्या या कार्याचे कौतुक करत आहेत.