टार्गेट पूर्ण न केल्यामुळे बॉसने चक्क केले असे काही की तुम्ही देखील हादरून जाल..
साधारणतः कोणत्याही कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेट दिले जाते. दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बॉस नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांना ओरडत असतात. कारण कर्मचाऱ्यांकडून टार्गेट पूर्ण करून घेणे ही बॉस ची जबाबदारी असते.
परंतु बॉसने देखील संयमाने राहणे आवश्यक असते नाहीतर अनेकदा बॉसच्या ओरडण्यामुळे कर्मचारी आणि बॉस यांच्यामध्ये वाद होत असतात. नुकतीच एक घटना मुंबई मधून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मधील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीत 30 वर्षीय आनंद हवालदार सिंग हे गेल्या वर्षीपासून या कंपनीमध्ये असोसिएट क्लस्टर मॅनेजरची नोकरी करत आहे. या कंपनीचा मॅनेजर 35 वर्षीय अमित सुरेंद्र सिंग याने आनंदला संबंधित टार्गेट पूर्ण करण्याचे काम दिले होते.
आनंद सिंगला सप्टेंबर महिन्यात 5 लाखांचा बिझनेस मिळवून देण्याचे टार्गेट दिले होते. परंतु, आनंद फक्त दीड लाखांचे टार्गेट पूर्ण करू शकला. अमित सिंगने दिलेले टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे आनंदने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि 9 ऑक्टोबरला त्याने कंपनीत आपला राजीनामा दिला.
मात्र, अमित सिंगने त्याचा राजीनामा स्वीकार केला नाही. त्याने शनिवारी बोलावून घेतले आणि त्याला दिलेल्या टार्गेट बद्दल विचारले असता आनंदने आपण आपले टार्गेट्स पूर्ण न केल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच बाकीचा राहिलेला सगळा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत देतो असेही सांगितले.
त्यानंतरही अमित सतत आनंदला फोन करत होता आणि त्याला फोनवरुन शि’वी’गा’ळ देखील करत होता. अमितने आनंदला संध्याकाळी पुन्हा कंपनीमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा आनंदला सगळा रिपोर्ट करत अमितकडे इन्सेन्टिव्ह ची मागणी केली असता अमितने इन्सेन्टिव्ह देण्यास आनंदला सरळ नकार दिला.
आनंदने ही चर्चा सर्व सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर करा असे सांगितले. यावर अमित संतापला आणि त्याने रागात त्याच्या टेबलवर असलेले घड्याळ उचलले आणि थेट आनंदच्या डोक्यात फेकून मारले. जोरात घड्याळ लागल्यामुळे आनंदच्या डोक्यातून र’क्त’स्रा’व होऊ लागला.
हे समजताच त्वरित सहकाऱ्यांनी आनंदला शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घड्याळ फेकून मारल्यामुळे घड्याळ तुटले आणि आनंदच्या डोक्यातून र’क्त’स्त्रा’व होऊ लागला होता. डॉक्टरांनी लगेचच आनंदच्या डोक्यातून प्लास्टिकचे तुकडे काढले आणि जखम झालेल्या भागात टा’के घातले.
या सर्व प्रकरणाबाबत कर्मचारी आनंद सिंग याने अमित सिंग विरोधात पोलिस ठाण्यात त’क्रा’र दाखल केली आहे. यावर पोलिसांनाही अमित सिंग वर गु’न्हा दाखल केला आहे. यावर पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.