चालताना अचानक खिशात असलेल्या मोबाईलने घेतला पे’ट, पायाला झाली जबर दु’खापत…

आज मोबाईल की काळाची गरज बनली आहे. मोबाईल शिवाय बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. असे असताना आपण नेहमी आपला मोबाईल आपल्या जवळच ठेवत असतो. नेहमी आपल्या खिशात ठेवतो. मात्र, नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जे जाणून तुमचा थरकाप उडेल.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामधील सौंदळ पुनर्वसन येथे राहणारे 25 वर्षीय अंकित विश्वनाथ भुते हे गावात असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जात होते. त्यांनी आपला मोबाईल आपल्या खिशात ठेवला होता. ते चालत असताना अचानक खिशात असलेल्या मोबाईलने पे’ट घेतला.

हा सगळा प्रकार गावकऱ्यांनी पाहताच त्यांनी लगेच अंकितकडे धाव घेतली आणि त्यांच्या खिशातील मोबाईल बाहेर काढला. या घटनेत अंकित यांचा पाय भाजला असून जबर जखम झाली आहे. त्यांना लगेच अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पायावर उपचार करून त्यांना आता घरी पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर मोबाइल एक्सपर्ट यांनी सांगितले आहे की, मोबाईल मध्ये लिथियम आणि पॉलिमर असते आणि हे द्रव्य जास्त चार्जिंग केल्याने अधिक गरम होते. यामुळे बॅ’ट’री फु’ग’ते आणि त्याचा स्फो’ट होण्याची शक्यता जास्त असते.

फक्त दोन तास आपला मोबाइल चार्ज करावा असा त्यांनी सल्ला दिला असून आपल्या मोबाईलचाच चार्जर वापरवा. तसेच मोबाइल वारंवार गरम होत असेल तर वेळीच उपाय करावा असे केल्याने वेळीच अशा प्रकारच्या घटना टाळता येतील असे मोबाइल एक्सपर्ट यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page