सुंदर हस्ताक्षरात ‘या’ डॉक्टरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन रुग्णांना देखील समजते, हस्ताक्षर बघून तुम्ही देखील चकित व्हाल..
आपल्यासोबत अनेकदा असे होत असते की डॉक्टर जे प्रिस्क्रीप्शन देतात त्यात नक्की काय लिहिलंय हे कधीच आपल्याला समजत नाही. त्या प्रिस्क्रीप्शनमध्ये काय लिहिलंय हे केवळ मेडिकलमध्ये औषध आणायला गेल्यानंतर तिथे असलेल्या फार्मासिस्टलाच समजते. ते बरोबर ते वाचून आपल्याला अचूक गोळ्या देतात. मात्र, सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र एका सुंदर हस्ताक्षरात लिहीलेले प्रिस्क्रीप्शन जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
फोटो मध्ये दिसत असणारे सुंदर हस्ताक्षर हे केरळच्या डॉ. नितीन नारायणन यांचे आहे. हे डॉक्टर केरळच्या पलक्कड मध्ये असणाऱ्या कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे बालरोगतज्ञ म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉ. नितीन नारायणन हे त्रिशूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे त्यांनी आपले एमडी शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे हस्ताक्षर लहानणापासूनच सुरेख होते आणि त्यांची ही कला त्यांनी कधीच मागे टाकली नाही. त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामुळे त्यांनी रुग्णांना देखील त्यांचे प्रिस्क्रीप्शन वाचता येते आणि समजते देखील, असे ते सांगतात. कित्येक डॉक्टरांनी लिहिलेले प्रिस्क्रीप्शन रूग्णांना समजत नाही.
परंतु ते कितीही घाईत असले तरीही ते नीट आणि रूग्णांना देखील समजेल अशा सुंदर हस्ताक्षरात आणि अगदी स्पष्ट प्रिस्क्रीप्शन लिहितात, असे डॉ. नितीन सांगतात. त्यांच्या या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रिस्क्रीप्शनचा फोटो सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्या हस्ताक्षराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.