दुसऱ्या पतीसोबत सुखी संसार चालू असताना अचानक पत्नी आपल्या पहिल्या पतीसोबत राहू लागली, कारण..
नागपूर मधील सीताबर्डी येथील अनामिका ही तरुणी आपल्या आईसोबत राहत होती. अनामिकाचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पती काहीच काम करत नसल्यामुळे तिने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि आईसोबत येऊन राहू लागली. काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रे’म’सं’बं’ध निर्माण झाले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अनामिका ने आपल्या पतीला आधी लग्न झाल्याची तसेच पहिल्या पतीसोबत घ’ट’स्फो’ट घेतल्याची देखील माहिती दिली. यावर दुसऱ्या पतीने तिच्यावर आसलेल्या प्रेमाखातर डोळे झाकून विश्वास ठेवला. पुढे काही दिवसांतच पत्नी आपल्या पहिल्या पतीच्या संपर्कात येऊ लागली. दोघे ही संपर्कात आल्यामुळे पहिल्या पती ने तिला परत येण्यास सांगितले असता ती देखील कोणताही विचार न करता पहिल्या पतीकडे निघून गेली.
ती घरच्यांना तसेच पतीला मावशीकडे राहायला जाते असे खोटं सांगून मध्यप्रदेश मधील शिवनी येथे राहणाऱ्या आपल्या पहिल्या पतीकडे राहण्यासाठी गेली. तब्बल पाच महिने उलटून गेले तरी पत्नी परत घरी आली नाही म्हणून दुसरा पती काळजीत पडला. त्याने शोधाशोध सुरू केली असता त्याची पत्नी परत आपल्या पहिल्या पतीकडे जाऊन राहत असल्याची माहिती त्याला मिळाली.
दुसऱ्या पतीने शीवनीला जाऊन पत्नीला परत नागपूरला आणले. नागपुरला परत येताच पहिला पती तिथे येऊन आपल्या पत्नीला घेऊन गेला. याबाबत दुसऱ्या पतीने सीताबर्डी येथे अनामिकाच्या अ’प’ह’र’णा’ची त’क्रा’र नोंदवली.
पोलीसांनी याचा तपास करून अनामिकला पुन्हा नागपूरला आणले. पोलीस चौकशीदरम्यान असे समजले की, अनामिकाने आपल्या पहिल्या पतीसोबत घ’ट’स्फो’ट न घेता दुसऱ्या पतीसोबत लग्न केले. त्यामुळे हे प्रकरण जास्तच गुंतागुंतीचे बनले. पोलिसांनी हे सगळे प्रकरण समुपदेशांकडे सोपवले. प्रकरण सुटल्यानंतर पत्नीने दुसऱ्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.