लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत को’सळली, 20 जणांचा झाला मृ’त्यू..
लग्न कार्य म्हटले की सगळीकडे अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. नातेवाईकांची नुसती धावपळ सुरू होते. परंतु नुकतेच असे एक प्रकरण समोर आले आहे की हा लग्नाचा उत्साह अचानक दुःखात बदलला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील पौडी येथून मंगळावरी लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस लालडंग येथून कांडा मल्लाच्या दिशेने निघाली होती.
या बस मध्ये 50 वऱ्हाडी होते. त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास ही बस सिमडी गावाजवळ 500 मीटर खोल असलेल्या दरीत को’स’ळ’ली. ड्रायव्हरचा बस वरील ताबा सुटल्याने हा भी’ष’ण अ’प’घा’त घडला. या अ’प’घा’ता’त 20 जणांचा मृ’त्यू झाला. या घटनेची बातमी समजल्यानंतर श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
बिरोखल आरोग्य केंद्रामधील डॉक्टर देखील या घटनास्थळी पोहचले. तेथील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या घटनेची पाहणी केली असून तात्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. राहिलेल्या बाकी लोकांचा तपास अजूनही सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.