मुले चो’रणारी टोळी समजून देवदर्शनासाठी मथुरा मधून आलेल्या साधूंना सांगली मधील ग्रामस्थांनी केली बेदम मा’रहाण

उत्तरप्रदेश येथील मथुरा मधून चार साधू देवदर्शनासाठी कर्नाटकच्या विजापूर या ठिकाणी एकत्र आले होते. त्यानंतर ते सांगली मधील जत तालुक्यामधील लवंगा येथे रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला होता. पुढे ते पंढरपूरकडे आपल्या खासगी चारचाकी वाहनातून ते रवाना होत होते.

पुढील प्रवासासाठी साधूंनी एका शालेय मुलाला रस्त्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांना ही मंडळी मुले चो’र’णा’री टोळी असल्याचा संशय आला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी मिळून या चौघा साधूंना गाडीतून बाहेर काढले आणि खूप मा’र’हा’ण केली तसेच बेदम चोपही दिला.

त्यामुळे साधू आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये खूप वादावादी झाली. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चारही साधूंना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्या चौघांकडे ही आपआपले आधार कार्ड आढळून आले. पोलिसांनी त्यांना अधिक माहिती विचारली असता, त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल क्रमांकही त्यांच्याकडून त्यांना मिळाले.

या सर्व प्रकारानंतर या चौघा साधूंची उत्तर प्रदेश येथील मथुरा या ठिकाणी चौकशी केली. तेव्हा ते मथुरा येथील खरे साधू असल्याचे समोर आले. हे सर्व साधू श्री पंचनाम जुना आखाडा येथील साधू असल्याचे समोर आले आहे.

हे साधू मुले चो’री करणारी टोळी नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणी पोलिसांनी गु’न्हा दाखल करून एकूण 6 जणांना अ’ट’क केल्याची माहिती सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page