ऐकावे ते नवलच! पहिल्या रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी म्हशीने दिला दुसऱ्या रेड्याला जन्म
नुकतेच एक प्रकरण सो’श’ल मी’डि’या’व’र व्हायरल झाले होते की, एका काळ्याकुट्ट म्हशीने एका पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला. आपण नेहमी पाहत आलो आहोत की म्हशीने किंवा गायीने एकाच दिवशी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. परंतु नुकतेच एक प्रकरण शाहूवाडी मधून समोर आले आहे. तेथील एका म्हशीने एका रेडकाला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी दुसऱ्या रेडकाला जन्म दिला आहे.
शाहूवाडी मधील ठमकेवाडी या गावातील रहिवासी असलेले शहाजी माने यांच्याकडे असणाऱ्या म्हशीने सोमवारी एका रेड्याला जन्म दिला. रेड्याला जन्म दिल्यानंतर 3 दिवस या म्हशीने नियमित दुध देखील दिले. मात्र, तिसऱ्या दिवशी असे काही घडले की जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
तिसऱ्या दिवशी सकाळी या म्हशीने दुध दिल्यानंतर शहाजी माने हे चारा टाकण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जे दिसले ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क 3 दिवसांनी या म्हशीने दुसऱ्या रेड्याला जन्म दिला होता.
विशेष म्हणजे या म्हशीची दोन्हीही वेळेस नैसर्गिक रीत्याच प्र’सू’ती झाली आहे. यामध्ये म्हैस देखील सुखरूप आहे आणि पहिल्या रेड्या सारखे दुसरे देखील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे. या घटनेनंतर माने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच गावातील लोक देखील या घटनेमुळे अचंबित झाले आहेत.
याआधी कोणत्या ही म्हशीने किंवा गायीने अशा प्रकारे बाळाला जन्म दिला नाही. अनेक वेळा एकाच दिवशी म्हशीने किंवा गायीने जुळ्या बाळांना जन्म दिल्याचा अनेक घटना आपण पहिल्या आहेत.
परंतू एका रेड्याला जन्म दिल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी दुसऱ्या रेड्याला जन्म दिल्याची ही घटना कदाचित दुर्मिळ घटना असल्याचे समोर आले आहे. या घटनेची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र देखील तुफान चर्चा होताना दिसत आहे. या दुर्मिळ घटनेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे