अरेरे! मिस्त्रीने टाईल्स लावण्याचे काम पूर्ण करूनही घरमालकाने पैसे दिले नाही, संतापलेल्या मिस्त्रीने मालकाच्या मर्सिडीजलाच लावली आ’ग..
जर एखादी व्यक्ती दिवसभर काम करत असेल आणि जर त्याने केलेल्या कामाचा त्याला जर योग्य मोबदला मिळत नसेल तर ती व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचा प्रत्यय नुकताच आला आहे. उत्तरप्रदेश येथील नोएडामध्ये एका मिस्त्रीने कामाचे पैसे न मिळाल्याने अत्यंत धक्कादायक कृत्य केले आहे. सध्या हा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल होत आहे.
नोएडा मध्ये राहत आलेल्या मिस्त्रीला सदरपूर परिसरातील सेक्टर-39 या ठिकाणी एका घरात टाईल्स लावण्याचे काम मिळाले होते. परंतु त्याला त्या कामाचे पूर्ण पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या या मिस्त्रीने पैसे न देणाऱ्या व्यक्तीची चक्क मर्सिडीज कारच पे’ट’व’ली. या घटनेचा व्हिडीओ सो’श’ल मी’डि’या’व’र व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मिस्त्री बाईकवरून येताना आपल्याला दिसतो. त्याने हेल्मेटही घातलेले होते. बाईकवरून उतरून तो मर्सिडीज कारजवळ गेला. कारवर पेट्रोल टाकतो आणि तिला चक्क आ’ग लावून देतो. त्यानंतर मिस्त्री बाईकवर बसून तिथून फरार झाला.
मिस्त्रीने कार मालकाच्या घरात टाईल्स लावण्याचे काम घेतले होते. मात्र मालकाने केलेल्या कामाचे पूर्ण पैसे दिले नाहीत. मिस्त्रीने वारंवार पैशांसाठी विचारणा केली. तरीही मालकाने पैसे दिले नाहीत. मालक पैसे देत नसल्याने मिस्त्रीचा संताप झाला होता. तो मालकाच्या घराबाहेर गेला आणि तिथे मालकाची मर्सिडीज कार उभी होती. संतापलेल्या या मिस्त्रीने त्याच कारला आ’ग लावली.
याआधी सुद्धा अशीच एक घटना 22 जूनला सहारणपूरमध्ये घडली होती. जे. जे. पुरम वसाहतीमधील एका घराबाहेरील कार पे’ट’वू’न देण्यात आली होती. सुमेर चंद यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारला आ’ग लागली तेव्हा घरातील सदस्य बाहेर आले.
मात्र बाहेर कोणीही नव्हते. कारमध्ये कोणतीच तांत्रिक अडचण नसताना अचानक आ’ग कशी लागली हा संशय होता. त्यावेळी चंद यांनी पोलीस ठाण्यात त’क्रा’र नोंदवली होती आणि त्यानंतर त्यासंदर्भात तीन तरुणांना अ’ट’क देखील करण्यात आली होती.