महिलेने आपल्या पतीसाठी करवा चौथ चा उपवास केला, पतीला घरी यायला उशीर होणारे हे समजताच..
सगळ्यात सुंदर आणि पवित्र नाते हे पती-पत्नीचे असते. ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे सोबती असतात. आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पत्नी सतत प्रथना करत असते. यासाठी महिला अनेक व्रतवैकल्ये करत असतात. अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे.
गुजरातमधील मोरबी येथील रंगपार या गावात राहणाऱ्या एका 23 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या पतीसाठी करवा चौथ चा उपवास केला होता. रात्री आपला पती लवकर येईल आणि उपवास सोडता येईल अशी तिची अपेक्षा होती. मात्र, पतीने घरी यायला उशीर होईल असे पत्नीला कळवले. पतीला यायला उशीर झाला म्हणून ती निराश झाली आणि या नै’रा’श्या’तू’न तिने स्वतः ची जीवनयात्रा सं’प’व’ली.
भारतीय समाजात असे मानले जाते की हा उपवास पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते आणि पतीच्या हातूनच पाणी पिल्यानंतर तिचा उपवास पूर्ण होतो, असे म्हणतात. परंतु पतीला घरी यायला उशीर होणार असल्याने या पत्नीने आपले आयुष्य सं’प’व’ले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या घटनेनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिक माहितीसाठी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.