‘शेती विकली आहे, पण तुला शिक्षण देण्यासाठी मी माझी कि’ड’नी’ही विकायला तयार आहे.. UPSC उत्तीर्ण होत इंद्रजित बनले IPS

IPS इंद्रजीत महाथा यांचा जन्म झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अत्यंत गरीब कुटुंबात झाला. इंद्रजित यांनी पाचव्या इयत्तेपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. एका मुलाखतीत इंद्रजित यांनी सांगितले की, पाचवीच्या वर्गात त्यांच्या शिक्षकाला जिल्हा प्रशासनाविषयी बोलताना ऐकले तेव्हा त्यांनी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला होता.

इंद्रजित यांचे वडील गरीब शेतकरी होते आणि कसे तरी घरासाठी दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करत होते. इंद्रजित ज्या घरात राहत होते ते कच्चे होते. त्याचवेळी घराच्या भिंतींनाही तडे जाऊ लागले. घरची परिस्थिती पाहून त्यांची आई बहिणीसोबत गेली आणि आजीकडे राहू लागली.

अभ्यासामुळे इंद्रजित यांनी घर सोडले नाही आणि त्याच घरात राहू लागले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडील एका माणसाच्या मदतीनेच घराची दुरुस्ती करू शकत होते. कसेबसे इंद्रजीत यांनी अभ्यास चालू ठेवला. नवीन पुस्तके घेण्याइतके पैसे नसल्याने ते रद्दी पुस्तके घेऊन अभ्यास करायचे. ते फक्त जुन्या पुस्तकांवर अवलंबून होते.

इंद्रजीत यांनी दिल्लीतून ग्रॅज्युएशन पूर्ण करावे म्हणून त्यांच्या वडिलांनी आपली जमीन विकायला सुरुवात केली. इंद्रजित पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘शेती विकली आहे, पण तुला शिक्षण देण्यासाठी मी माझी कि’ड’नी’ही विकायला तयार आहे. पैशाची अजिबात काळजी करू नको.’

वडिलांचा त्या’ग आणि इंद्रजित यांच्या मेहनतीमुळे त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे स्वप्न साकार केले. इंद्रजित हे त्यांच्या क्षेत्रात यूपीएससी पास करणारे पहिले व्यक्ती ठरले. आयपीएस इंद्रजीत महाथा म्हणतात की, ठाम हेतू आणि कठोर संघर्षानेच यश मिळवता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page