सलाम! वाहतूक पोलिसाने जेवण बाजूला ठेवून ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला जागा करून दिली..

मुंबईच्या वरळी नाका येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गुरव आपली ड्युटी बजावत होते. दुपारचे जेवण करण्यासाठी त्यांनी थोडावेळ ब्रेक घेतला होता. जेवण करत असताना त्यांना अचानक रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू आला.

ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकली असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्वरित आपले जेवण बाजूला ठेवले आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक कोंडीच्या दिशेने धाव घेतली. त्याच वेळी हा व्हिडिओ काढला आहे असे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट केला आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करून त्यांनी कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस निरीक्षक विलास गुरव यांचे खूप कौतुक केले आहे. त्यांनी केलेल्या या कामामुळे पोलीस वर्दीचा अभिमान आणखी वाढवला आहे, असे ते म्हणतात.

हा व्हिडिओ 13 सप्टेंबरचा असून या व्हिडीओमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गुरव यांनी आपले जेवण बाजूला ठेवून एका रुग्णवाहिकेला ट्रॅफिक कोंडीमधून वाट करून दिली. त्यांनी प्रसंगावनधान साधत त्वरित वाहतूक कोंडी फोडली. त्यासाठी त्यांनी दोन सिग्नल थांबवले आणि रुग्णवाहिकेला जायला जागा करून दिली.

विलास गुरव यांचा हा व्हिडीओ सध्या सो’श’ल मी’डि’या’वर धुमाकूळ घालत आहे. त्यांनी बजवलेल्या या कर्तव्यदक्षतेबद्दल अनेकांकडून त्यांचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. आपल्या पोलिस वर्दीचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे, त्यामुळे मनाला समाधान मिळते, असे विलास गुरव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विचाराने अनेकजण प्रेरित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page