लग्नाच्या 15 वर्षांनंतर महिलेने आपल्या पती आणि पाच मुलांना सोडून विवाहित प्रियकरासोबत थाटला संसार..

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक अनोखे प्रेम प्रकरण समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे अनोखे प्रेम प्रकरण राजस्थान येथील अलवर जिल्ह्यातील असून 2007 मध्ये अलवर जिल्ह्यातील जाजोर का बास येथे राहत असलेले तैयब खान यांचे हरियाणामधील तावडू मध्ये राहणाऱ्या नूरजहाँ यांचासोबत विवाह झाला होता. या दोघांना 5 मूलं आहेत.

15 वर्षानंतर नूरजहाँ यांनी आपल्या 5 मुलांना सोडून अलवर येथे असलेल्या तुलेदा गावामध्ये राहणाऱ्या मौसम खान यांच्यासोबत नवीन संसार थाटला आहे. नूरजहाँ आणि मौसम खान यांचे प्रे’म’सं’ब’ध होते म्हणून त्यांनी लग्न करून नवीन आयुष्याला सुरवात केली आहे.

मौसम खान हा देखील विवाहित आहे. त्याला देखील 5 मुलं आहेत. त्याने आपली पहिली पत्नी आणि पाच मुलांना त्याच्या आजी-आजोबांकडे ठेवले आहे. मुलाने केलेल्या या कृत्याबद्दल त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या कुटुंबातून बेदखल केले आहे. तसेच पोलिस ठाण्यात त’क्रा’र ही नोंदवली आहे.

नूरजहाँ यांनी देखील आपल्या मुलांना बाल संरक्षण आयोगाकडे सोडले आहे. तिथे सोडल्यानंतर मुलं खूप रडू लागली होती आणि आईच्या मागे धावत होती. परंतु नूरजहाँ यांनी मुलांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. पोलीस व बालकल्याण समितीचे सदस्यांना हे पाहून वाईट वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page