पत्नीच्या मृ’त्यू’नं’त’र पत्नीचे बॅंक खाते बंद करण्यासाठी गेलेल्‍या पतीला बसला धक्‍का, कुटुंबाला मिळणार…

सोलापूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. सोलापूर मधील रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मित नि’ध’न झाले होते. त्यांच्या नि’ध’ना’नं’त’र रवींद्र गायकवाड आपल्या पत्‍नीचे बँक खाते बंद करून खात्यात असलेले पैसे त्यांच्या खात्यात वळवून घेण्यासाठी बँकेत गेले होते. मात्र, तिथे गेल्यानंर त्यांना असे काही समजले की ते जाणून ते आश्चर्यचकित झाले.

आपण पाहतो की सरकार अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा अनेकजण लाभ घेत असतात. यापैकीच शिल्पा गायकवाड एक होत्या त्यांनी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ घेतला होता. शिल्पा गायकवाड या सोलापुर मधील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. तसेच त्यांचे पती रवींद्र गायकवाड हे बिगारी कामगार आहेत.

एका महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मिक नि’ध’न झाले. त्यांचा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा आधार होता. मात्र, त्यांच्या नि’ध’ना’नं’त’र संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिल्पा यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

शिल्पा यांच्या मृ’त्यू’नं’त’र काही दिवसांनी रवींद्र गायकवाड यांच्या लक्षात आले की शिल्पा यांचे सोलापूर शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते आहे. त्यांच्या खात्यात थोडे पैसे शिल्लक असतील तर त्याची कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत होईल. या आशेने रवींद्र गायकवाड आणि त्यांचे मित्र यशवंत हे दोघे मिळून भारतीय स्टेट बँकेत गेले.

बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना त्यांच्या पत्नीच्या नि’ध’ना’ची बातमी सांगितली. आणि त्यामुळे शिल्पा यांच्या खात्यातील पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून द्या आणि पत्नीचे अकाउंट बंद करा अशी विनंती रवींद्र यांनी शाखा अधिकाऱ्यांना केली.

त्यांनतर बँकेच्या शाखा अधिकारी यांनी सर्व प्रकार लक्षात घेता शिल्पा गायकवाड यांचे स्टेटमेंट चेक केले. तेव्हा शिल्पा यांनी प्रधानमंत्री जीवन विमा ही योजना काढली होती हे त्यांच्या निदर्शनास आले. या योजनेच्या नियमांनुसार खाते धारकाचे नि’ध’न झाले असता त्यांच्या वारसाला दोन लाख रुपये मिळतात.

विशाल यांनी ही माहिती रवींद्र यांना सांगताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. खरे तर ते केवळ आपल्या मृ’त पत्नीचे बँक खाते बंद करण्यासाठी आले होते मात्र, इथे आल्यानंतर त्यांचे नशीबच बदले. या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यावर असलेल्या त्यांच्या कुटुंबाचा भार हलका झाल्यासारखा वाटला.

यांनतर शाखा अधिकाऱ्यांनी रवींद्र यांना योजनेचा पूर्ण लाभ घेता यावा यासाठी काही कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आणि ती कागदपत्रे त्यांनी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेकडे पाठवले. यांनतर त्या योजनेतर्फे शिल्पा यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा झाले. मिळालेले पैसे पाहून रवींद्र तसेच त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले.

त्यांनतर शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांची एकंदरीत परिस्थिती समजली असता त्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम त्यांच्या तीन मुलींच्या नावाने एफडी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला, जेणेकरुन भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात त्याचा त्यांना लाभ घेता येईल.

हे ऐकून रवींद्र गायकवाड यांनी देखील विशाल यांना संमती दिली आणि सर्व कुटुंबियांनी शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांचे आभार मानले. अशा प्रकारे शिल्पा यांनी घेतलेल्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर या गरीब कुटुंबाला आधार तर मिळालाच, एवढेच नाही तर त्यांच्या भविष्याची देखील चिंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page