वडिलांना पाहून चिमुकलीने घेतली धाव, पोहचण्याआधीच गाडीने ध’ड’क दिली, वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलीने सोडले प्राण..

मुली या घरात त्यांच्या वडिलांच्या खूप लाडक्या असतात. मुलींसाठी आपले वडील म्हणजे एक सुपरहिरो असतात. मुलींना अगदी लहानपणापासूनच सगळ्यात जास्त ओढ ही त्यांच्या वडिलांचीच असते. वडिल आणि मुलीचे नाते खूप खास असते. वडिल कामावरून घरी आले हे मुलीने पाहिले की मुलगी धावत जावून त्यांची बॅग घेणार त्यांना पाणी देणार ही मुलीची रोजची दीनचर्याच झालेली असते आणि हे करण्यात मुलींना देखील खूप आनंद होत असतो.

आज आपण अशीच एक घटना पाहणार आहोत ज्यात अवघ्या 14 महिन्यांची चिमुकली आपल्या वडिलांना पाहताच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे धावली. मात्र, याचदरम्यान रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या कारला अंदाज न आल्याने चिमुकलीच्या अं’गा’वरून गाडीचे चाक गेले. त्यामुळे चिमुकलीचा दु’र्दै’वी मृ’त्यू झाला आहे.

ही हृदयद्रावक घटना नाशिक शहरातून समोर आली आहे. नाशिकच्या अंबड लिंकरोड परिसरात असलेल्या विराट नगर येथे ही दु’र्दै’वी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले 28 वर्षीय अमजद अख्तर खान हे आपल्या पत्नीच्या उपचारांसाठी काही दिवसांपासून नाशिक येथे राहत होते.

अमजद यांच्या पत्नीवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे ते नाशिक शहरातील विराट नगर अंबड लिंक रोड परिसर येथील नातेवाइकांच्या घरी गेल्या 15 दिवसांपासून राहत आहेत. त्यांना एक 14 महिन्यांची मुलगी देखील आहे तिचे नाव आयेशा अमजद खान असे आहे.

अमजद हे नाशिकमध्ये आल्यानंतर ते आपल्या नातलगांसोबत अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून मोलमजुरीचे काम करण्यासाठी जात असत. यादरम्यान, बुधवारी संध्याकाळी अमजद कामावरून घरी परतत होते. त्याचवेळी आयेशाचे लक्ष तिचे वडील अमजद यांच्यावर गेले आणि त्यांना भेटण्यासाठी तिने त्यांच्या दिशेने धाव घेतली.

मात्र, दु’र्दै’वा’ने त्याचवेळी समोरून आलेल्या कारची आयेशाला जोरात ध’ड’क बसली. याचदरम्यान ती खाली पडली आणि वाहन चालकाला ती गाडीखाली आल्याचा अंदाज न आल्याने तिच्या अंगावरून गाडीचे चाक गेले आणि त्यातच आयेशा अत्यंत गंभीररित्या जखमी झाली. या अ’प’घा’ता’नंतर तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाशिकमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

परंतु, रूग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी आयेशला मृ’त घोषित केले. ही बातमी ऐकून अयेशाचे वडिल अमजद यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अवघ्या 14 महिन्यांच्या मुलीचा मृ’त्यू आपल्या डोळ्यांसमोर झालेला पाहून त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परीसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

तसेच या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यात नोंदवली असून कार चालक हसन मुजमिल खानविरुद्ध गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page