गच्चीवरच पार पडले लग्न! बॉलिूडमधील ‘या’ सुपरहीट जोडीची लव्हस्टोरी ही आहे फिल्मी!

अजय देवगण आणि काजोल हे बॉलीवुडमधील सेलिब्रिटी कपल प्रचंड लोकप्रिय आहे. काजोल आणि अजय यांच्या लग्नाला 24 वर्षे पूर्ण झाली तरीही आज काजोल आणि अजयचे नाते अगदी घट्ट बांधलेले आहे. बॉलिवूडमधील जास्त काळ टिकलेले आणि  अगदी गुण्यागोविंदाने संसार करणाऱ्या जोडप्यांपैकी काजोल आणि अजय देवगण हे एक जोडपे आहे.

या कपल मध्ये असे काहीतरी दडलेले आहे जे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वी अजयने त्यांच्या लग्नाची एक जुनी आठवण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. चला तर पाहूया त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी..

अजय आणि काजोल यांची पहिली भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. पण त्यावेळी अजय देवगणला काजोलचा स्वभाव आवडला नव्हता. याविषयी अजय देवगणने सांगितले की, जेव्हा त्याने काजोलला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिला ती खूप बडबडी आणि अहंकारी मुलगी वाटली होती. परंतु, जसेजसे ते एकमेकांच्या संपर्कात येवू लागले तसतशी हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण होऊ लागली.

परंतु, त्यावेळी काजोल दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, काही कारणास्तव त्यांचे नाते तुटले. अशा परिस्थितीमध्ये अजयने काजोलला भावनिक आधार दिला होता. त्यावेळेस दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले तसेच त्यांच्या भेटीगाठीही वाढू लागल्या होत्या त्यामुळे त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काजोल आणि अजय यांच्या लग्नासाठी तिच्या वडीलांची संमती नव्हती.

काजोलचे वडिल अवघ्या 24 व्या वर्षी काजोलने लग्न करण्याच्या विरोधात होते. कारण काजोलने लग्न केले तेव्हा ती बॉलिवूडच्या टॉप हिरोईनपैकी एक होती. त्यामुळे काजोलने आणखी काम करून प्रगती करावी आणि त्यानंतरच लग्नाचा विचार करावा, असे तिच्या वडीलांना वाटत होते. मात्र, काजोलची आई तनुजा यांचा तिच्या लग्नाला पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे मी अजय सोबत लग्न करण्याचा निर्णय पक्का केला, असे तिने सांगितले.

त्यावेळेस अजयला त्यांचे लग्न अगदी साधेपणाने केले जावे अशी इच्छा होती. यावर काजोलने ही होकार दिला आणि चक्क अजयच्या घराच्या गच्चीवरच त्यांचा विवाह पार पडला. अशा प्रकारे  24 फेब्रुवारी 1999 मध्ये अजय आणि काजोल लग्न बंधनात अडकले.

आता काजोल आणि अजय यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली असून आजही ते दोघे सुखाने संसार करत आहेत. त्या दोघांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. पालकांची जबाबदारी देखील ते दोघं उत्तमप्रकारे सांभाळत आहेत. त्याच बरोबरीने दोघं अजूनही सिनेसृष्टीतही सक्रिय आहेत. त्यांचे हिट चित्रपट घेवून ते नेहमीच आपल्या चाहत्यांना खुश करत असतात. यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page