सोनाली कुलकर्णी आणि तिचा नवरा कुणाल यांचे फोटो..

मराठी चित्रपसृष्टीतील अप्सरा असे म्हटले की क्षणार्धात ओठांवर नाव येते ते म्हणजे सोनाली कुलकर्णी.. या अप्सराने अनेकांना आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ केले आहे. तिने तिच्या उत्कृष्ट अशा नृत्याने आणि अभिनय कौशल्यामुळे या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ती सो’श’ल मी’डि’या’व’र नेहमी सक्रीय असते आणि नेहमीच नवनवीन पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने तमाम रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळया भुमिका साकारून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तसेच ‘नटरंग’ या चित्रपटातून ती लोकांच्या मनामनात पोहचली. महाराष्ट्रातील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी खऱ्या आयुष्यात कुणाल बेनोडेकर या तरुणाशी लग्नबंधनात अडकली आहे.

सोनालीने 18 मे रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या सर्व चाहत्यांना एक आनंदाचा धक्का दिला. ते म्हणजे तिने तिचा नवरा कुणाल बेनोडेकर याच्याशी साखरपुडा झाल्याचे फोटो सो’श’ल मी’डि’या’वर शेअर केले. सर्वत्र निर्बंध सुरु होण्याच्या आधी सोनाली आणि कुणाल यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये आपला साखरपुडा पार पाडला.

सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक येथील भागात काम करतो. कुणालने लंडन मध्ये ‘मर्चंट्स टेलर स्कूल’ मधून BSC चे शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांनतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स येथून उच्च शिक्षण घेतले. कुणाल लंडनमध्ये वास्तव्यास होता मात्र, काही वर्षांपासूनन तो कामानिमित्त दुबई येथे राहतो. गेल्या काही वर्षापासून कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत होते, असे त्यांनी सांगितले आहे.

प्रत्येक मुलीची इच्छा असते की, आपले लग्न थाटामाटात व्हावे, असेच स्वप्न सोनालीचे ही होते. परंतु, निर्बंध असल्याने त्या दोघांनी 7 मे 2021 रोजी रजिस्टर लग्न केले होते. त्यावेळेस लग्नात तिच्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे सर्व काही नीट झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न करण्याच्या निर्णय घेतला आणि त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी त्याच दिवशी पुन्हा एकदा लग्न केले.

7 मे 2022 रोजी लंडनमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मागील वर्षी लग्नाची हौस पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी हे लग्न मोठ्या थाटात पार पाडले. मराठीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी देखील या लग्नाला हजेरी लावली होती. एखाद्या मराठी कलाकाराचा विवाह सोहळा कसा पार पडत असेल याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. खरेतर कलाकार हे नेहमीच आपल्या वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवत असतात.

मात्र, सोनालीला तिच्या आयुष्यतील हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करायचा होता. म्हणूनच तिने या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी ‘प्लॅनेट’ मराठीसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म तिला मिळाले. “या माध्यमातून माझा लग्नसोहळा जगभरातील माझे चाहते तसेच सगळे मराठी प्रेक्षक पाहू शकतील”, असे सोनाली म्हणाली.

एखाद्या कलाकाराचा लग्न सोहळा ओटीटीवर प्रक्षेपण होण्याची ही पहिलीच वेळ होती. याद्वारे सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला लग्नसोहळा सगळ्यांना पाहता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page