या तरूणाने चक्क ऑटोवरच उभारले आलिशान घर! सर्व सोयीसुविधा आहेत उपलब्ध..

प्रत्येकाकडे काहीना काही कला असतेच फक्त ती कला प्रत्यक्षात आत्मसात करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. जिद्दी बरोबरीने जर आत्मविश्वासही असेल तर ती गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो. कित्येक लोक आपल्या बुदधिमत्तेचा वापर करून अनेक अनोखी गोष्टी जगासमोर घेवून येत असतात. अशा गोष्टी ज्याची आपण कल्पना ही करू शकत नाही. आज आपण अशीच एक अनोखी गोष्ट जाणून घेणार आहोत. जी तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामधील अरुण प्रभूने करून दाखवली आहे.

तामिळनाडूच्या नामक्कल जिल्ह्यामध्ये राहणारा अरुण प्रभू हा पेशाने एक आर्किटेक्ट आहे. त्याने जे अनोखे घर बनवले आहे ते इतरांसाठी एका कल्पनेच्या पलीकडचे आहे. 23 वर्षीय अरुण प्रभूने असे घर बनवले आहे जे पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले आहेत. अरुणने स्वतः डिझाईन करून चक्क एका ऑटोवरच अतिशय सुंदर असे घर उभारले आहे. या घरात फक्त राहताच येत नाही तर ते घेवून फिरता देखील येऊ शकते. अरुणने या घराला ‘सोलो 0.1’ असे नाव दिले आहे.

अरुणच्या या चालत्या फिरत्या घरामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या घरात एक बेडरूम, एक किचन आणि बाथरूम ची देखील सोय करण्यात आली आहे. हे संपूर्ण घर त्याने कोणत्याही प्लॉटवर न उभरता चक्क एका ऑटोवर उभारले आहे. अरुणने केलेला हा आविष्कार पाहण्यासाठी अनेक लोक येथे येत असतात. अरूणला या अनोख्या घराची कल्पना कशी सुचली या विषयी तो सांगतो कि, या मोबाईल होमची प्रेरणा त्याला चेन्नईमध्ये असताना मिळाली होती.

चेन्नईमध्ये अरुणने आपले पदवी शिक्षण घेतले आहे. 2019 साली जेव्हा तो चेन्नई आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहिला तेव्हा त्याला जाणीव झाली की, या ठिकाणी लोकांना सर्व सुविधा मिळत नाहीत. झोपडपट्टीमधील लोक घाणीत राहतात तसेच तिथे नीट स्वच्छता नसते आणि अशाच अस्वच्छ ठिकाणी जेवण बनवून ते खाल्ले जाते. यावर विचार करत अरुणने लोकांची गरज ओळखून त्याला ऑटोवर मोबाईल होम बनवण्याची कल्पना सुचली आणि त्याने एका ऑटोवरच घर उभारले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण हा अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण आहे. तो म्हणतो की, मी माझ्या कुटुंबामधील असा पहिला व्यक्ती आहे ज्याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. असा अनोखा प्रयोग करण्याचा तो आधीपासूनच विचार करत असल्याचे तो सांगतो. विशेषतः झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये त्याला परिवर्तन घडवून आणयाचे होते.

अशा लोकांना सर्व सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी मला काहीतरी प्रयत्न करण्याची इच्छा होती असे अरूण सांगतो. अरुणने या घराचे 6 बाय 6 लेआउटवर डिझाईन केले आहे.  या घराची खास गोष्ट म्हणजे, या घरात सौर उर्जेद्वारे विज पुरवली जाते. यासाठी त्याने या घरात 600 वॅटचा सोलर पॅनल बसवला आहे.

या घरात मॉडेलर किचन बावण्यात आले आहे. तसेच बाथरुम मध्ये देखील उत्तम सोयी करण्यात आल्या आहेत. यासाठी पाण्याची सोय करण्यासाठी 250 लिटरची टाकी बसवण्यात आली आहे. एवढेच नाही तर या घरामध्ये एका 70 लिटरच्या कंटेनरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे ज्यामध्ये कचरा जमा केला जातो. असे हे सर्व सुविधा उपलब्ध असणारे चालते फिरते तीन चाकी घर बनवण्यासाठी अरुणला केवळ एक लाख रुपये खर्च आला आहे. सध्या त्याच्या या आविष्काराची सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page