ऊसतोड कामगाराच्या मुलाचे हस्ताक्षर पाहून सगळेच झाले अवाक! मोत्यासारखे अक्षर पाहून तुम्हालाही पडेल भुरळ..

अनेक पालक आज मुलांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेताना नाक मुरडतात. परंतु, जिल्हा परिषदेच्या शाळेने आजवर अनेक व्यक्तिमतत्व घडवलेली आहेत आणि अजूनही घडवत आहेत. नुकताच अशाच एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विदयार्थी सार्थक बटुळे हा सो’श’ल मी’डि’या’व’र तुफान व्हायरल होत आहे.

फोटो मध्ये दिसत असणारे हे मोत्यासारखे सुलेख आणि सुवाच्च अक्षर कोणा एका मोठ्या व्यक्तीचे नसून अवघ्या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या सार्थक बटुळे या चिमुकल्याचे आहे. हे सुंदर हस्ताक्षर पाहून प्रत्येकाचे डोळे स्तब्ध होतील यात तीळ मात्र शंका नाही.

सार्थक बटुळे हा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून तो सध्या त्याच्या अप्रतिम अशा सुंदर लेखनामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने अहमदनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे त्याच्या हस्ताक्षराचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.

सार्थक बटुळे याचे आईवडिल ऊसतोड कामगार असून ते गावा बाहेर जाऊन काम करत असतात. यादरम्यान आई वडिलांच्या कष्टांना हा चिमुकला खऱ्या अर्थाने न्याय देतोय अशी पोस्ट सो’श’ल मी’डि’या’व’र प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

ऊसतोड कामगार असणाऱ्या या आईवडिलांच्या मुलाचे यश पाहून खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन सार्थकी झाले आहे. त्याची लिखाणाची ही सुंदर कला पाहून सगळ्यांचे डोळे दिपले आहेत त्यामुळे सार्थकला सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page