ST पाठोपाठ आता मेट्रोतही 25% सवलत, जेष्ठ, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मिळणार लाभ!

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली होती. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले आणि लाखो महिला प्रवाशांनी या सवालतीचा फायदा घेतला. आता मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली आहेत ज्यात, जेष्ठ, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25% सवलत दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून वरील श्रेणीतील लोकांना 25%सवलत देण्यात येणार आहे. यामुळे 45 किंवा 60 ट्रिपसाठी ही सवलत मिळणार आहे. “लोकांची सुरक्षितता आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो (Mumbai Metro) नेटवर्क तयार केले आहे.”

त्यामुळे या सुविधाचा लाभ वरील श्रेणीतील लोकांना जास्तीत जास्त मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी देखील आम्ही जेष्ठ नागरिकांना एसटी मध्ये मोफत प्रवासाची सूट दिली आहे तर महिलांना 50% सवलत देण्यात आली आहे.

आम्ही दिलेल्या या सवलतीमुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्याची संख्या वाढेल आणि जास्तीत जास्त नागरिक या सुविधेचा फायदा उचलतील अशी मला आशा असल्याचे Maharashtra CM Eknath Shinde यांनी सांगितले. ही सवलत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, बारावीपर्यंत शिकणारे विध्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये जेष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा, दिव्यांग नागरिकांना सरकारी किंवा वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र आणि विद्यार्थांना शाळा ओळखपत्र असे वैध कागदपत्रे सादर करावी लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page