दहावीच्या परीक्षेनंतर 3 विद्यार्थी गाडी घेऊन फिरायला निघाले, मात्र अचानक कार कालव्याची भिंत तोडून नर्मदेत कोसळली आणि..

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने अ’प’घा’ताच्या अनेक घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृ’त्यू झाला आहे. अनेकदा लहान मुलेही गाडी घेऊन बाहेर पडून अ’प’घा’ताला ब’ळी पडतात. आता असेच एक प्रकरण कडी येथून समोर आले आहे. जिथे नर्मदा कालव्यात 3 विद्यार्थ्यांची गाडी अडकली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कडी येथील करणनगर रोडवर राहणारे व इयत्ता दहावीत शिकणारे जिग्नेश, तक्ष आणि देव हे विद्यार्थी काल सामाजिक शास्त्राचा पेपर देऊन घरी परतले. तेथून घरच्यांना न सांगता जिग्नेश आपली वॅगनर गाडी घेऊन दोन मित्रांसह फिरायला निघून गेला.

कार घेऊन जात असताना कडी येथील थोर रोडवरील बोरिसना येथील मुख्य नदीच्या कालव्यावरील सर्व्हिस रोडवर कारचा तोल गेल्याने भिंत तोडून कार कालव्यात कोसळली. त्यामुळे कालव्यात पडलेल्या तीन विद्यार्थ्यांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. तेवढ्यात पतीसोबत जात असलेल्या एका महिलेने ही घटना पाहिली आणि तिला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली.

महिलेने तिची साडी काढली आणि पतीच्या मदतीने कालव्यात फेकली, नवऱ्याने मुलांना वाचवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनाही बोलावले, दोन विद्यार्थी साडीचा काट धरून बाहेर आले मात्र देव नावाच्या विद्यार्थ्याचा पत्ता लागला नाही. देव याचा कारसह पाण्यात बु’डू’न मृ’त्यू झाला. तर इतर दोन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page