लहानपणापासून कायम सोबत असलेल्या दोन जिवलग मित्रांचा मृ’त्यू देखील झाला सोबतच, असा झाला त्यांचा दु’र्दैवी अंत…

आदित्य रामनाथ सुंब आणि यश भाऊसाहेब शेंगुळे हे दोघे गंगापूर येथील छोट्या गावातील रहिवासी आहेत. आदित्य आणि यश हे दोघेही बालपणापासूनच खूप खास मित्र आहेत. कोणतेही काम ते एकमेकांसोबतच करायचे. या दोघा मित्रांना उच्चशिक्षित होऊन अधिकारी व्हायचे होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे जिवलग मित्र आपले  गाव सोडून शहराच्या दिशेने निघाले होते.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून शहराकडे निघाले असता महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ नाशिक येथील हैद्राबादला जाणारा ट्रक रस्त्यावर उभा होता आणि अचानक समोर ट्रक उभा पाहून दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन ध’ड’क’ली. हा अ’प’घा’त एवढा भीषण होता की या अ’प’घा’ता’त दुचाकीचा पूर्णपणे चु’रा’डा झाला आहे. यात दोघा मित्रांचा मृ’त्यू झाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांचेही मृ’त’दे’ह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत.

या घटनेमुळे कायम सोबत असलेल्या दोन मित्रांना आपला जीव ग’म’वा’वा लागला. दोघांचाही अत्यंत दु’र्दै’वी अंत झाला. या धक्कादायक घटनेमुळे गंगापूर येथील ते राहत असलेल्या परिसरात शो’क’क’ळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page