आई मुलीला दुचाकीवरून घेऊन जात होती, अचानक कुत्रा पुढे आडवा आला आणि..

नाशिककरांना वारंवार कुत्र्यांच्या ह’ल्ल्यां’ना सामोरे जावे लागत आहे. नाशिक मध्ये कुत्र्यांनी ह’ल्ला केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. येथे गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरुन द’ह’श’त माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येला नाशिककरांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. नुकतीच एक घटना नाशिकमधील कोणार्कनगर येथून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील कोणार्कनगर मध्ये राहणाऱ्या दीपाली घुमरे या आपल्या दोन वर्षीय मुलगी दिव्यांश्रीला दुचाकी वरुन घेऊन जात होत्या. ते नांदूर नाका ते जत्रा हॉटेल यादरम्यान जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर एक कुत्रा आडवा आला. त्यामुळे दीपाली यांना अचानक ब्रेक दाबावा लागला. हे एवढं अचानक झालं की, दुचाकी न थांबता खाली पडली.

दुचाकी खाली पडल्यामुळे मायलेकी दोघीही खाली पडल्या त्यामुळे दोघींनाही जबर मार लागला. यामध्ये दिपाली यांची दोन वर्षांची मुलगी दिव्यांश्री हीच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि त्यामुळे ती बे’शु’द्ध झाली होती.

त्यामुळे त्वरित दीपाली यांनी त्यांच्या भावाला फोन करून त्याला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनतर तेथील नागरिकांच्या मदतीने त्यांनी दिव्यांश्रीला ताबडतोब परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अं’त झाला आहे.

या घटनेनंतर दिपाली यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सर्वत्र परीसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात दोन वार्षिय चिमुकलीच्या अ’प’घा’ती मृ’त्यू’ची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नाशिकच्या विविध भागात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात अ’प’घा’त होत आहेत. तसेच अनेकांना आपले जीव ग’म’वा’वे लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक मधील नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page