“आई, उठ ना, माझ्यावर चिडली आहेस का?” मुलाला वाटलं आई झोपली आहे पण दोन दिवसापूर्वीच..

बंगळुरू येथून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका आईचा मृ’त्यू झाला होता पण तिच्या लहान मुलाला याची कल्पना देखील नव्हती. दोन दिवस त्याला वाटत होते कि आई आपल्यावर नाराज आहे आणि ती चिडल्यामुळे त्याच्याशी बोलत नाही.

मिळालेल्या बातमीनुसार, बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये राहणाऱ्या अन्नम्मा यांचा कमी रक्तदाबामुळे मृ’त्यू झाला. अन्नम्मा झोपेत असतानाच बहुतेक त्यांचे नि’ध’न झाले असावे. त्यामुळे त्यांच्या 11 वर्षाच्या मुलाला आई झोपेतच आहे असे वाटत होते.

घरात फक्त आई आणि मुलगा हे दोघेच राहत होते. अन्नम्मा यांच्या पतीचे किडनीच्या आजाराने वर्षभरापूर्वी नि’ध’न झाले होते. आपल्या आईचा मृ’त्यू झाला आहे याची त्याला जरा देखील कल्पना नव्हती. दोन मित्रांसोबत खेळायला बाहेर जायचा आणि जेवायला देखील त्यांच्याकडे असायचा.

माझी आई माझ्याशी बोलत नाही, ती माझ्यावर चिडली आहे आणि ती दोन दिवसापासून उठली नाही, असे त्याने त्याच्या मित्राच्या वडिलांना सांगितले. मित्राच्या वडिलांना हे ऐकून धक्काच बसला. त्यांनी त्वरित त्याचे घर गाठले.

घरी जाऊन तपासणी केली असता, त्याच्या आईचे नि’ध’न झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या सर्व घटनेची माहिती त्वरित आरटी नगर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page