ऐकावे ते नवलंच! जावई बायकोला सोडायला सासरी गेला आणि चक्क मेहुणीसोबत पळून गेला

रोज आपल्या अवती भोवती विचित्र घटना घडत असतात. काही गोष्टी मनाला भिडणाऱ्या असतात तर काही गोष्टी ऐकून आपल्याला धक्काच बसतो. अशीच एक घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून समोर आली आहे. येथील घोंदलगाव गावात एका जावयाने बायकोला माहेरी सोडल्यानंतर 17 वर्षीय मेहुणीला चक्क पळवून नेले आहे.

यामुळे सासरवाडीत नुसता गोंधळ उडाला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. घरातील लोकांनी थेट पोलीस स्टेशन गाठत जावयाची त’क्रार केली आहे. पोलिसांनी देखील जावई आणि त्याचा साथीदार यांच्या विरुद्ध गु’न्हा दाखल केला आहे.

घोंदलगाव येथे राहणाऱ्या मुलीचे लग्न कापूसवाडगाव येथील तरुणाशी झाले होते. एकाच तालुक्यात सासुरवाडी असल्या कारणाने जावयाचे सासुरवाडीत नेहेमीचे येणे-जाणे होते. त्यांचे सर्व सुरळीत चालू होते. पण हाच जावई असे काहीतरी करेल असे मुलीच्या आई-वडिलांना स्वप्नात देखील वाटले नव्हते.

हा तरुण बायकोला माहेरी सोडण्यासाठी गेला होता आणि मुक्कामी राहिला. जावई घरी आल्यामुळे सासरच्या मंडळींनी देखील जेवणाची उत्तम सोय केली होती. सकाळी उठून पाहिले तर त्यांची 17 वर्षीय अ’ल्प’वयीन मुलगी घरात कुठेच दिसत नव्हती. कुटुंबातील लोकांनी तिला गावात देखील शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही हाती लागले नाही.

तोपर्यंत त्यांना त्यांच्या जावयाचा फोन आला की त्याने मुलीला काल रात्री पळवून नेले आहे. जावई म्हणाला की आता आम्हाला लग्न करायचे आहे तर त्यासाठी 10 हजार रुपये देखील पाठवा. हे ऐकताच कुटुंबातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबातील सदस्यांनी जावई आणि त्याचा मित्र यांच्याविरुद्ध त’क्रार नोंदवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page