“आमदारांनी व्हीप झुगारल्याने उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार” जयंत पाटलांचे हे भाकीत खरे ठरणार? हे व्हीप म्हणजे नक्की काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता दोघेही आपल्या कामात सक्रिय झाले असून हे सरकार लोकांचे मनातील सरकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

परंतु या राजकीय नाट्यात नवीन ट्विस्ट आला आहे. जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देतात म्हटले आहे कि, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्र राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यांनी पुढे असे म्हटले की, शिवसेना आमदारांनी व्हीप झुगारून विश्वासदर्शक ठरवावेळी मतदान केले.

यामुळे सुप्रीम कोर्टात याचा निवाडा करण्यासाठी खंडपीठ नेमले जाणार आहे. येणाऱ्या 3-4 महिन्यातच सर्व गोष्टींचा निकाल लागेल. यामुळे शेवटी राज्यपालांना उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

परंतु अनेक लोकांना ‘व्हीप म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न पडला आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. एखाद्या राजकीय पक्षाचा अधिकार म्हणजे व्हीप, जो विधानसभा आणि संसदेच्या सभागृहात पक्षाचा अंमलबजावणी करणारा म्हणून काम करतो.

यामुळे प्रत्येक पक्ष हा एक व्हीप नियुक्त करतो आणि त्याच्यावर पक्षाच्या शिस्तीची आणि सभागृहातील वर्तनाची जबाबदारी असते. यामुळेच व्हीप हा पक्षाचा संसदेतील महत्त्वाचा पदाधिकारी असतो. व्हीप ही संकल्पना भारताला ब्रिटिश संसदीय प्रणालीतुन मिळाली आहे.

जर कुठल्या आमदाराने या व्हीपचे उल्लंघन केले तर त्या आमदाराला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते, जोपर्यंत व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांची संख्या पक्षाच्या संख्याबळाच्या 2/3 आहे. सभागृहाच्या सभापतीद्वारे अपात्रतेचा निर्णय घेतला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page