या माणसाने घर बांधण्यासाठी 88 वर्ष जुन्या झाडाची एकही फांदी न तोडता बांधले चार मजली आलिशान घर..

आधुनिक जगात अनेक लोक झाडे तो’ड’ण्या’त गुंतले आहेत, तर काही पर्यावरणवादी आहेत जे लाखो झाडे वाचवण्यास वाचवण्यास तयार आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा एका व्‍यक्‍तीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पर्यावरणाच्‍या प्रेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका इंजिनिअरने आपल्या स्वप्नातील घर बनवले आहे.

अभियंता केपी सिंह यांनी 87-88 वर्षे जुन्या झाडावर त्यांचे स्वप्नातील घर बांधले आहे. या अनोख्या घराचे फोटो सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलेच व्हायरल होत आहेत. या झाडावर बांधलेल्या चार मजली घरामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लेक सिटी उदयपूरमध्ये अभियंता केपी सिंह यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने घर बांधले आहे. निसर्गाची हा’नी होऊ नये म्हणून त्यांनी 88 वर्षे जुन्या झाडावर चार मजली घर बांधले. त्यांचे घर आपल्या अनोख्या सौंदर्यामुळे देश-विदेशात चर्चेचा विषय बनले आहे. या घरात सर्व सुविधा आहेत.

त्यांनी 2000 साली आपले घर बांधले. जे जमिनीपासून 9 फूट उंच आहे. त्याची उंची 40 फुटांपर्यंत आहे. सुमारे तीन हजार चौरस फूट कार्पेट एरियावर बांधलेल्या या घरामध्ये दोन बेडरूम, जेवणाची जागा असलेला हॉल, एक लायब्ररी, एक स्वयंपाकघर, दोन एकत्रित शौचालये आणि एक हवेशीर बाल्कनी आहे.

या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या वाढीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मध्ये काही जागा सोडण्यात आली आहे. निसर्गाची किंवा झाडांची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि तो कायम हिरवागार राहते.

या घराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या घराच्या बांधकामात सिमेंट किंवा खडीचा वापर केलेला नाही. इमारत बांधण्यासाठी स्टील स्ट्रक्चर, सेल्युलर आणि फायबर शीटचा वापर करण्यात आला आहे. याला ट्री हाऊस असे नाव देण्यात आले आहे.

या अनोख्या घरातून हवा येते. पण कोणतेही वादळ आले तरी त्याचे काही होत नाही. या घराला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. अभियंता केपी सिंग यांचीही ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page