पत्नीचे दागिने ग’हा’ण ठेवून या व्यक्तीने गावात बांधला पूल, आता संपूर्ण जग करतंय सलाम..

निवडणुका आल्या कि आपल्याला नेते दिसतात, जिंकल्यावर मात्र ते गायब होतात आणि हे चित्र देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बघा. खरोखरच देशाच्या विकासासाठी काम करणारे किंवा एक पाऊल टाकणारे नेते फार कमी आहेत. ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकमधील गुंजरामपंजारा गावातही अशीच परिस्थिती होती.

नेत्यांनी गावातील रस्त्यासाठी आश्वासने दिली मात्र आश्वासनांची पूर्तता केली नाही. नेत्यांची आश्वासने ऐकून एक व्यक्ती एवढी संतापली कि त्यांनी स्वतः गावच्या पुलाचा प्रश्न सोडवला. गावातील अडचणी कमी करण्यासाठी या व्यक्तीने पत्नीचे दागिने ग’हा’ण ठेवले.

एका अहवालानुसार, रणजीत नायक नावाच्या व्यक्तीने जून 2022 मध्ये प्रशासन आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून आशा सोडली होती. गुंजारामपांजरा गावात सुमारे 100 कुटुंबे राहतात. व्यवसायाने ट्रक चालक असलेल्या नायक यांनी अनेक राजकारण्यांना खोटी आश्वासने देताना ऐकले.

नेत्यांनी सांगितले की बिचला नदीवर पूल बांधला जाईल जेणेकरून गावकऱ्यांना जवळच्या कालाहांडी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात सहज पोहोचता येईल. विशेष म्हणजे एकाही नेत्याने हे आश्वासन पूर्ण केले नाही.

नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना अनेक जण जखमी झाले. नदी खोल नव्हती पण प्रवाह वेगाने होता. रणजीतने सांगितले की, नदीचा प्रवाह इतका वेगवान होता की बाईकही वाहून जायची. नदीवर पूल बांधल्याने गावकऱ्यांना कालाहंडी व नबरंगपूर जिल्ह्यात सहज प्रवास करता येणार होता, मात्र पूल बांधण्यास कोणी पुढाकार घेत नव्हते.

रणजितने गावकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्याचा निर्णय घेतला होता. काँक्रीटचा पूल त्याला परवडत नव्हता, पण रणजीतने हिंमत न गमावता लाकडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. रणजीतला काहीही करून गावकऱ्यांच्या या समस्येचे निराकारण करायचे होते आणि त्यासाठी त्याने आपल्या पत्नीचे दागिनेही ग’हा’ण ठेवले होते. दागिने देऊन 70 हजार रुपये मिळवले आणि त्यावर पूल बांधण्यासाठी बांबू, लाकूड आदी खरेदी केले.

रणजितचे वडील कैलाश यांनीही आपल्या मुलाच्या या उदात्त कार्यात मदत करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून पुलाचे काम सुरू केले. मागील महिन्यात बाप-लेकाच्या या जोडीने या पूल तयार केला. आता या पुलावरून फक्त गावकरीच नाही तरी दुचाकी गाड्या देखील जाऊ शकतात. रणजितच्या या उदात्त कार्याचे आज जगभर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page