सरपंच ते मुख्यमंत्री- वाचा विलासराव देशमुख यांचा संघर्षमय प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राष्ट्रीय राजकारणातील काँग्रेस नेत्यांपैकी सर्वात महत्वाचे मानले जाणारे नेते म्हणजे विलासराव देशमुख. महाराष्ट्रातील लातूर ग्रामपंचायतीतून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली ती थेट राष्ट्रीय राजकारणात येऊन पोहचली. महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये त्यांचे पद खूप मोठे आणि महत्वाचे होते.

26 मे 1945 साली लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या ठिकाणी विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी सायन्स आणि आर्टस् मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यासोबतच, पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेजमधून कायद्याचे देखील शिक्षण त्यांनी घेतले. त्यांनी तरुण वयात असतानाच समाजसेवा सुरु केली आणि विशेष म्हणजे दुष्काळ क्षेत्रात ते सातत्याने काम करत होते.

त्यांच्या पत्नीचे नाव वैशाली देशमुख असून त्यांना अमित, रितेश आणि धीरज अशी तीन मुले आहेत. अमित देशमुह हे राजकरणात सक्रिय आहेत तर रितेश देशमुख अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. विलासराव देशमुख यांनी सरपंच पदापासून सुरवात केली आणि ते लातूर पंचायत समितीचे उपाध्यक्ष देखील होते. तसेच ते ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील होते.

पुढे त्यांनी मागे वळून पहिले नाही आणि 1980 ते 1995 या सलग तीन निवडणुकांमध्ये विधानसभेवर निवडून आले आणि विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणून काम केले. यादरम्यान त्यांनी गृह, ग्रामविकास, कृषी, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, उद्योग, वाहतूक, शिक्षण, तंत्रशिक्षण, युवा घडामोडी, क्रीडा यासारख्या पदांवर मंत्री म्हणून आपले काम केले. राजकारणात आल्यावर त्यांनी लातूरचा चेहरामोहरा बदलून टाकला.

विलासराव देशमुख 1995 मध्ये निवडणूक हरले पण 1999 च्या निवडणुकीत पुन्हा विधानसभेत परतले आणि पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांना मध्यंतरी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पण पुढच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केले .

त्यांच्या कार्यकाळादरम्यान मुंबईत द’ह’श’त’वादी ह’ल्ला झाला. याची नैतिक जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते केंद्रीय राजकारणाकडे वळले आणि राज्यसभेचे सदस्य झाले. यासोबतच विलासराव देशमुख हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page