पुण्यातील महिला पोलीस कर्मचारी साबळे मुसळधार पावसात सफाई कामगाराचं काम करताना दिसल्या..
पुणे येथील सहकारनगर वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस नाईक साबळे यांच्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सो’श’ल मी’डि’या’वर तुफान व्हायरल होत आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे रस्त्यांवर मोठया प्रमाणावर पाण्याचा साठा होत आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडताना आपल्याला दिसते. त्यांना या पाण्यातून वाहतूक करणे अवघड जात आहे.
अशा वेळी नाईक साबळे यांनी आपले कार्य बजावत असताना सामाजिक भान देखील जपले आहे. भर पावसात रस्त्यावर पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी साठलेल्या पाण्याला त्यांनी वाट करुन दिली.
आधी त्यांनी बॅरीकेट घालून बॅरीकेटच्या पुढे उभ्या राहून त्या झाडाच्या मोठ्या फांदीने पाण्याला जाण्यासाठी दुसरीकडे वाट करुन देत होत्या आणि वाहनांना दुसऱ्या बाजूने जावे अशा सूचना ही त्या देत होत्या.
त्यांच्या या कार्याचा व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’वर काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. नाईक साबळे यांनी आपले कर्तव्य बजावत केलेल्या या कामाचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
प्रसंगावधान राखून नागरीकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिकतेचे भान देखील जपले आहे. खाकी वर्दी मध्ये असणाऱ्या या पोलीस महिलेने वेळेचे आणि परिस्थितीचे भान राखत दाखवलेली तत्परता खरच कौतुकास्पद आहे.