लग्नाच्या काही वर्षानंतर पतीपासून वि’भ’क्त झाल्या, दोन मुलांना सांभाळत सफाई कर्मचारी म्हणून काम केले, आज आहे SDM अधिकारी

एखाद्या व्यक्तीला जर यश मिळवायचे असेल तर, त्यासाठी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असावी लागते. असे असेल तर त्याला यश हमखास मिळतेच. आज आपण अशाच एका महिला अधिकारी बद्दल पाहणार आहोत. राजस्थानमधील रहिवासी असलेल्या आशा कंडारा या विवाहित असून गेल्या काही वर्षांपासून त्या आपल्या पतीपासून वि’भ’क्त होऊन आपल्या दोन मुलांसमवेत राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.

अशा परिस्थितीमध्ये आशा यांनी कुटुंबाची आर्थिक परीस्थिती सुधारण्यासाठी 2016 मध्ये त्यांनी एसएससीची तयारी सुरू केली. कोणत्यातरी क्षेत्रात यश मिळेल अशी त्यांना आशा होती म्हणून त्यांनी अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी फॉर्म भरले होते.

आशा कंडारा यांना 2018 मध्ये जोधपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. तेव्हाही त्या सरकारी नोकरीच्या परीक्षा देत होत्या. त्या आरएएस परीक्षेची तयारी करत होत्या. नोकरी सांभाळून तसेच त्यांच्या दोन मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडून अभ्यास करणे तितकेसे सोपे नव्हते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या अभ्यास करायच्या.

2 वर्षे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी केल्यानंतर 2021 रोजी आशा कंडारा यांना जोधपूर महानगरपालिकेने कायमस्वरूपी नोकरीवर ठेवले. यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. मात्र, यानंतर काही दिवसांतच आरएएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये आशा यांनी चांगला क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. आता आशा कंडारा यांनी थेट एसडीएम पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

आशा कंडारा यांना प्रशिक्षणानंतर एसडीएम पदावर नियुक्ती केले गेले. परंतु त्यांना आता आयएएस पद मिळवण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी आयएएस परीक्षेची तयारी देखील सुरू ठेवली आहे. आशा कंडारा यांचे विचार लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. मेहनत केली तर यश हमखास मिळतेच याचे आशा कंडारा हे उत्तम उदाहरण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page