अजब प्रेमाची गजब कहाणी! अवघ्या 19 वर्षांचा मुलगा चक्क 56 वर्षाच्या आजीच्या प्रेमात झालाय खुळा..

प्रेमात पडलेली व्यक्ती कशाचीही तमा न बाळगता एखाद्या व्यक्तीवर निस्सीम प्रेम करत असते. प्रेम करण्याला वय नसते तसेच प्रेमात पडलेले प्रत्येकजण आंधळे असतात असे म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये साखोन नाखोन प्रांतात राहणारे 19 वर्षीय वुथिचाई चंताराज हा 56 वर्षीय असलेल्या जानला नमुआंगराक यांच्या शेजारी राहतो. वुथिचाई 10 वर्षांचा असताना त्यांची भेट झाली होती.

एकदा आपल्या घराची साफसफाई करत असताना वुथिचाय हा त्यांना मदत करत होता. यादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. यानंतर सततच्या भेटीनंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

या दोघांच्या वयात 37 वर्षांचा फरक असूनही हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात. ही खरोखरच आश्चर्यकारक बाब आहे. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकत्रच राहत आहेत असे सांगितले जात आहे. वुथिचाई हा खूप प्रेमळ आहे असे जानला सांगतात. त्यांना वुथिचाईचा सहवास आवडतो.

19 वर्षीय वुथिचाई सुद्धा 56 वर्षीय जानला यांच्यावर खूप प्रेम करतो आणि आता त्याला त्यांच्यासोबत लग्न देखील करायचे आहे असे सांगितले जाते. त्या दोघांचीह एंगेजमेंट देखील झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ते सध्या एकमेकांना जाणून घेण्यासाठी डेट करत आहेत, असे सांगितले जात आहे. त्या दोघांचे एकत्रित असलेला फोटो सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक जण त्यांना शुभेच्छाही देत आहेत. वुथिचाई आणि जानला यांच्या अनोख्या प्रेमाची कथा सो’श’ल मी’डि’या’व’र  तुफान चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page