भारतातील हे गाव आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव, येते प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात आहेत 15 लाख रुपये

आपला भारत हा देश विकसनशील देश आहे. भारतात अनेक श्रीमंत लोक राहतात. मुकेश अंबानी, गौतम अदानी सारखे अनेक लोक भारतात अब्जाधीश आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत गाव हे आपल्या भारतात आहे. होय, तुमचा विश्वास बसत नसेल पण हे खरे आहे. या गावाचे नाव माधापर असे असून ते गुजरात मध्ये आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, गुजरातमधील माधापर गावातील रहिवाशांच्या 17 पेक्षा जास्त बँकांमध्ये ₹ 5,000 कोटी जमा आहेत. 17 बँकांमध्ये ठेवी आणि जवळपास 7,600 गृहनिर्माण आस्थापनांसह, हे गाव जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत गाव आहे.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेले हे गावं कच्छच्या मिस्त्रींनी स्थापन केलेल्या 18 गावांपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधापरमध्ये सरासरी दरडोई ठेव जवळपास 15 लाख आहे जी कोणत्याही गावापेक्षा सर्वात जास्त आहे. तसे बघायला गेले तर हे गाव शहरांपेक्षा खूप समृद्ध आहे असे दिसून येते. हे गाव शाळा, हॉस्पिटल, मंदिरे, धरण अशा अनेक सुविधांनी सुसज्ज आहे.

हे गाव एवढे श्रीमंत असल्या मागे प्रमुख कारण म्हणजे, या गावातील अनेक सदस्य आणि त्यांचे नातेवाईक हे परदेशात राहतात आणि तिकडे कामाला असतात. गावातील बहुतांश लोक हे युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, आखाती देश आणि आफ्रिका यासारख्या देशांमध्ये कामाला आहेत.

ज्यांच्या घरातील लोक परदेशात स्थायिक आहेत असे लोक, गावातील त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात पैसे पाठवतात आणि जे लोक अनिवासी भारतीय आहेत असे लोक देशात परत आले आणि त्यांनी गावात आपले उद्योग सुरू केले.

माधापर व्हिलेज असोसिएशन या नावाने ओळखल्या जाणार्‍या संस्थेची लंडनमध्ये 1968 मध्ये स्थापना करण्यात आली होती. या संघटनेचा उद्देश परदेशात राहणार्‍या माधापरमधील लोकांच्या भेटीची सोय करणे हा होता. गावकऱ्यांमध्ये सुरळीत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी गावातही असाच उद्देश असलेले कार्यालय उघडण्यात आले.

अनेक गावकऱ्यांनी परदेशात वास्तव्य करून काम केले असले तरी त्यांनी आपली मुळे नेहमीच माधापरच्या मातीत खोलवर रुजवली आहेत. ते त्यांचे पैसे आता राहत असलेल्या देशाऐवजी त्यांच्या गावातील बँकांमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. गावाचा मुख्य व्यवसाय आजही शेती असून, उत्पादनाची मुंबईला निर्यात केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page