ढोकळा खाताना नवरीला ठसका लागला, मुंबईच्या डॉक्टरचा लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीला झाला मृ’त्यू

एखाद्या मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असतो. या दिवसाची खूप आतुरतेने ती वाट पाहत असते कारण ज्याच्यावर आपले प्रेम आहे तो आता कायमस्वरूपी आपला होणार असतो. पण नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाआधीच मुलीचा मृ’त्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मुंबईत डॉक्टरची प्रॅक्टीस करणाऱ्या तरुणीचा लग्नाच्या आधल्या दिवशी मृ’त्यू झाला आहे. यामुळे लग्नघरात आनंदा ऐवजी शो’क’क’ळा पसरली आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव असून दुसऱ्या दिवशी तिचे लग्न होणार होते, परंतु हळदीच्या दिवशीच काळाने आ’घा’त केला.

मेघा काळे यांच्या मृ’त्यूचे कारण जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. त्याचे झाले असे की, मेघा या नाश्ता करत होत्या आणि नाश्त्यामध्ये ढोकळा होता. ढोकळा खात असताना अचानक एकाएकी त्यांना ठसका लागला. यामुळे त्यांनी लगेचच पाणी पिले, परंतु यानंतर त्यांना बोलताच आले नाही.

त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. हे पाहताच त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांचा मृ’त्यु झाला. MBBS झालेल्या मेघा काळे या मुंबईत प्रॅक्टिस करत होत्या. नाशिक मध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले होते आणि 20 मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. परंतु आदल्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार घडला.

पोलिसांनी देखील याची दखल घेत नाश्त्याचे सॅम्पल गोळा केले आहेत. त्याला लॅब मध्ये पाठवून त्याची तपासणी केली जाणार आहे. तसेच मेघा काळे यांचा पो’स्ट’मा’र्टे’म रिपोर्ट आल्यावर नक्की काय आहे ते कळेल असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page