धावत्या ट्रेनमध्ये चक्क शौचालयासमोर या युवकाने विवाहित महिलेशी केला विवाह..

प्रत्येकाला आपले लग्न खूप खास व्हावे असे वाटत असते. परंतु मागील दोन वर्षांच्या काळात लग्नाच्या प्रसंगांचे वातावरण बदलून गेले. परंतु यादरम्यान, अनेक लोक काही अनोख्या पद्धतीने लग्न करून प्रसिद्ध झाले आहेत. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सो’श’ल मी’डि’या’व’र देखील व्हायरल झाले होते.

परंतु, आज आपण अशा एका लग्नाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधून ही घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याने असे लग्न केले आहे जे आपण कधी पाहिलेच नसेल. या जोडप्याने चक्क धावत्या ट्रेनमध्ये अनोख्या पद्धतीने लग्न केले आहे.

बिहारमधील आशुकुमार या युवकाने एका चालत्या ट्रेनमध्ये शौचालयासमोर एका विवाहित महिलेशी लग्न केले. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण मुलीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. त्यानंतर अनुकुमारी या तरुणीचे किरणपूर गावात राहणाऱ्या एका युवकाशी लग्न लावून दिले.

मात्र, लग्न झाल्यानंतर अनुकुमारीने तिच्या पतीला स्वीकारण्यास नकार दिला आणि लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी ती सासर सोडून पळून गेली. त्यांनतर अनुकुमारी तिच्या प्रियकराला भेटली आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघेही सुलतानगंज स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी बंगळुरुला जाण्यासाठी रेल्वे पकडली. त्यावेळेस कोणताही वेळ वाया न घालवता त्या दोघांनी चक्क रेल्वेच्या शौचालयासमोरच लग्न केले आणि दोघे ही लग्नबंधनात अडकले. सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page