करोडोंच्या संपत्तीचे मालक असून अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगतात नाना पाटकेर, फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल..

काही कलाकार असतात जे त्यांच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध होतात पण काही कलाकार असे असतात जे त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि डॉयलॉग डिलिव्हरीने प्रसिद्ध होतात आणि त्यातीलच एक म्हणजे नाना पाटेकर. अनेकदा कलाकाराकडे प्रसिद्धी आली की ते ग्लॅमर मध्ये हरवून जातात पण नाना पाटकेर करोडोंची संपत्ती असून देखील अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगत आहेत.

जवळपास गेली 40 वर्षे ते चित्रपट सृष्टीर काम करत आहेत. फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. पण तिथे देखील त्यांचा वावर हा अतिशय नम्र आणि साध्या पध्दतीने आहे. अनेक कलाकारांनी त्यांचे यासाठी कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांचे राहणीमानाचे काही फोटो सोशल मी’डि’या’वर तुफान व्हायरल झाले होते. त्यांनी हिंदी आणि मराठीत अनेक चित्रपट केले आहेत आणि त्यांची संपत्ती देखील करोडात आहे. पण ते एका सामान्य व्यक्ती प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात.

त्यांचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ते सामान्य माणसाप्रमाणे जमिनीवर बसून मांडी घालून जेवण जेवत होते. नाना पाटेकर यांचा हा साधेपणा पाहून लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. तसेच नाना पाटेकर अनेकदा कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवतात.

अनेकदा नेटकरी त्यांच्या साधेपणाचे कौतुक करताना थकत नाहीत. ज्या कलाकारांना पैशांचा घमंड आला आहे त्यांनी नानांकडून काहीतरी शिकावे असे देखील काही लोक बोलत आहेत. एकेकाळी नाना फक्त 75 रुपयात काम करायचे त्यामुळेच बहुतेक त्यांना परिस्थितीची आणि वेळेची जाण असेल, असे लोक बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page