गेम खेळण्याऐवजी 6 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या फोनवरून 1, 2 नाही तर तब्बल 82 हजारचे जेवण मागवले, वडिलांनी बँक अकाउंट पाहिले तर..

सध्याच्या इंटरनेटच्या जगात स्मार्टफोनची क्रेझ एवढी वाढली आहे की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच स्मार्ट फोन वापरत आहेत. यामध्ये लहान मुले तर सरार्स स्मार्ट फोन्सचा वापर करताना आपण पाहत आहोत. सतत फोन्समध्ये व्हिडिओ पाहणे तसेच विविध गेम्स खेळण्यासाठी मुलं स्मार्ट फोन्स वापरत आहेत. यामुळे लहान मुलांना फोन्सचे व्य’स’न’च लागलेले आहे.

परंतु, अनेकदा याचे गंभीर परिणाम झालेले आपण पाहतो. लहान मुलांना फोन्स देताना ते आपल्या देखरेखीखालीच द्यायला हवेत. अन्यथा ते पालकांना चांगलेच महागात पडू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यात जे समोर आले आहे ते धक्कादायकच होते..

कीथ स्टोनहाऊस हे आपल्या 6 वर्षाच्या मुलाला रोज झोपण्यापूर्वी अर्धा तास गेम खेळण्यासाठी मोबाईल देतात. मात्र, या मुलाने एके दिवशी गेम खेळण्याऐवजी फूड डिलिव्हरी ऍप उघडले आणि त्याने अनेक रेस्टॉरंटमधून मोठ्या प्रमाणात जेवण ऑर्डर केले. त्याने एकूण $1000 म्हणजेच सुमारे 82 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते.

कीथ स्टोनहाऊस यांना वाटले की आपला मुलगा गेम खेळत असेल. पण मुलाने हा सगळा पराक्रम केला होता आणि याची त्यांना भनक देखील लागली नाही. यांनतर मुलगा एवढ्यावरच थांबला नव्हता 82 हजाराचे अन्न ऑर्डर करून त्याने त्यावर 25% टिपही दिली होती.

त्यांनतर दरवाजाची बेल सतत वाजत राहिली कारण मुलाने ऑर्डर केलेले पदार्थ एकामागून एक येऊ लागले होते. पहिल्यांदा त्याने हॅप्पी रेस्टॉरंटमधून सँडविच मागवले. त्यानंतर लियो मधून आइस्क्रीम मागवले होते. हे पदार्थ घरी येतच होते तसेच त्याने बऱ्याच ठिकाणावरून आणखी पदार्थ मागवले होते त्यात सॅलड, चिली चीज फ्राईज, ग्रेप लीव, राईस या व अशा अनेक पदार्थांचा समावेश होता.

ज्यावेळेस एकामागे एक पदार्थ घरी येवू लागले त्यावेळेस आपल्या मुलाने हा कारनामा केल्याचे वडिलांना समजले. त्यांनतर कीथ स्टोनहाऊस यांनी मोबाईल घेतला आणि पाहिले तर त्यांच्या मुलाने हा सगळा प्रकार केला होता. त्यांनी लगेच त्यांचे बँक अकाऊंट पाहिले तर त्यांच्या खात्यातून पैसेही गेले होते. किंमत पाहून तर ते पुरते हादरलेच. मुलाने तब्बल 82 हजार रुपयांची ऑर्डर केलेल्या या घटनेची सध्या सो’श’ल मी’डि’या’व’र जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page