लहानपणी अनवाणी पायाने धावून 5 सुवर्णपदके जिंकली, मेहनतीमुळे आज आसामच्या डीएसपी बनल्या..

चला जाणून घेऊया एका गरीब घरातील मुलीने अनवाणी शेतात धावून अथलीट आणि नंतर डीएसपी होईपर्यंत कशी धाव घेतली. हिमा यांचा जन्म 9 जानेवारी 2000 रोजी आसाममधील नागाव जिल्ह्यातील धिंग गावात झाला. हिमा यांच्या घरात एकूण 16 सदस्य राहतात ज्यामध्ये त्यांना 5 भावंडे आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.

लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या हिमा यांना अभ्यासात कधीच रस वाटला नाही. अभ्यासात रस नसल्याने त्यांनी खेळाला प्राधान्य दिले. या सगळ्यात वडिलांनी त्यांना खूप साथ दिली आणि तेच त्यांचे पहिले प्रशिक्षक बनले. अनेक वर्षांपासून त्या पहाटे 4 वाजता उठून भातशेतीत धावण्याचा सराव करत असे.

हिमा त्यांच्या वडिलांच्या शेतात फुटबॉल खेळायच्या. त्यांची खेळातील आवड पाहून एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना धावण्याचा सल्ला दिला. जेव्हा त्यांनी त्यांचे स्थानिक प्रशिक्षक निपुण दास यांचा सल्ला घेत जिल्हास्तरीय 100 आणि 200 मीटर स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यांनी सुवर्णपदक जिंकले. येथूनच हिमा यांच्या ऍथलेटिक कारकिर्दीला सुरुवात झाली.

हिमा दास यांची उत्कटता आणि चमकदार कामगिरी पाहून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, त्यापैकी एक अर्जुन पुरस्कार होता. यासोबतच नुकतेच त्यांना आसाम पोलिसात डीएसपीही बनवण्यात आले आहे.

यावेळी हिमा म्हणाल्या की, “हे बालपणीचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. त्यांना लहानपणापासून पोलीस अधिकारी व्हायचे होते आणि आसाम पोलीस दलात सेवा करून आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page